स्टीफन हॉकिंग्ज यांच्या पीएचडी प्रबंधामुळे क्रॅश झाली केंब्रिजची वेबसाइट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 10:17 IST2017-10-25T10:17:06+5:302017-10-25T10:17:59+5:30

कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग्ज या आठवड्यात नव्याने चर्चेमध्ये आले आहेत.

Cambridge's website Crashed on Stephen Hawking's PhD Management | स्टीफन हॉकिंग्ज यांच्या पीएचडी प्रबंधामुळे क्रॅश झाली केंब्रिजची वेबसाइट

स्टीफन हॉकिंग्ज यांच्या पीएचडी प्रबंधामुळे क्रॅश झाली केंब्रिजची वेबसाइट

ठळक मुद्दे कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग्ज या आठवड्यात नव्याने चर्चेमध्ये आले आहेत. स्टीफन यांच्या पीएचडीचा प्रबंध केंब्रिज विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकताच जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि विचारवंत त्यावर अक्षरशः तुटून पडले. प्रबंध वाचण्यासाठी लाखो लोकांनी संकेतस्थळ उघडल्याने केंब्रिज विद्यापिठाचे संकेतस्थळच क्रॅश झालं .

लंडन- कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग्ज या आठवड्यात नव्याने चर्चेमध्ये आले आहेत. स्टीफन यांच्या पीएचडीचा प्रबंध केंब्रिज विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकताच जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि विचारवंत त्यावर अक्षरशः तुटून पडले. प्रबंध वाचण्यासाठी लाखो लोकांनी संकेतस्थळ उघडल्याने केंब्रिज विद्यापिठाचे संकेतस्थळच क्रॅश झालं .

1966 साली स्टीफन यांनी "प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिग युनिवर्सेस" हा प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधास  लिहून ५० वर्षे उलटून गेल्यानंतर तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंब्रिजने घेतला. त्यानंकर मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना विद्यापीठाचे प्रवक्ते स्टुअर्ट रॉबर्ट म्हणाले, "हा प्रबंध संकेतस्थळावर टाकण्याच्या निर्णयाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. 24 तासांच्या अवधीमध्ये हा प्रबंध 60 हजार लोकांनी डाऊनलोड केला, त्यामुळे संकेतस्थळाची गती कमी झाली असून काहीवेळेस वाचकांना वेबपेज तात्पुरतं उपलब्ध नाही' असा संदेश येत आहे."

"हा प्रबंध वाचण्यासाठी लोकांनी दाखवलेला उत्साह आनंददायी असून तो संकेतस्थळावर वाचल्यावर त्यांची निराशा होणार नाही अशी मी आशा बाळगतो,अशी गंमतीदार प्रतिक्रिया हॉकिंग्ज यांनी संकेतस्थळ क्रॅश होण्यापुर्वी दिली होती. विद्यापिठानेही लोकांच्या या प्रतिसादाबद्ल आनंद व्यक्त केला असून या निर्णयामुळे नव्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

कोण आहेत स्टीफन हॉकिंग्ज ?

हॉकिंग्ज यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला. हॉकिंग्ज एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग्ज यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यासारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
२००१ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील विज्ञानक्षेत्रातील संशोधन संस्थेने आयोजीत केलेल्या 'स्ट्रींग' या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्या परिषदेत हॉकिंग्ज यांनी दिलेलं व्याख्यान प्रसिद्ध आहे. टीआयएफआरने त्यांना सरोजिनी दामोदरन फेलोशिपही दिली आहे.

Web Title: Cambridge's website Crashed on Stephen Hawking's PhD Management