शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

फेसबुक डेटा लिक प्रकरण : केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकानं सगळे कामकाज केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 8:50 AM

भारतीयांची फेसबुकवरील माहिती चोरून गैरवापर करणाऱ्या ब्रिटनच्या केंब्रिज अ‍ॅनालिटिकानं आपले सारे कामकाज त्वरित बंद केल्याची घोषणा केली आहे.

मुंबई - भारतीयांची फेसबुकवरील माहिती चोरून गैरवापर करणाऱ्या ब्रिटनच्या केंब्रिज अ‍ॅनालिटिकानं आपले सारे कामकाज त्वरित बंद केल्याची घोषणा केली आहे. या कंपनीने अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी निवेदन देण्याचीही घोषणा केली आहे. आता व्यवसायात राहण्याची कोणतीही शक्यता नाही, असंही कंपनीनं  सांगितले आहे. केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीवर फेसबुकच्या कोट्यवधी लोकांचा व्यक्तिगत डेटा चोरी करून दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.

केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही अमेरिकेतील एक मोठी अॅनॅलिसिस फर्म आहे. या कंपनीने 2016 मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काम केल्याने त्याची चर्चा झाली होती. या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेल्या विजयाचे श्रेय केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका कंपनीलाही दिले गेले. 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाची स्थापना करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या आधी या कंपनीने सेनेटर टेड क्रूझ यांच्यासाठीही काम केले होते.

केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका ही मोठ्या प्रमाणावर डेटा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक क्रिस्टोफर वाइली यांनी 2016 मध्ये या कंपनीच्या काम करण्याच्या पद्धती समोर आणल्या होत्या. 2014 मध्येच वाइली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 5 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब त्यांनी उघडकीस आणली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

अमेरिकन काँग्रेसपुढे झुकरबर्गची दिलगिरी

केंब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणात फेसबुकचा वापर करणाऱ्यांची खासगी माहिती सुरक्षित ठेवून तिचा गैरवापर होऊ न देण्यासाठी पुरेसे उपाय न केल्याबद्दल फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे दिलगिरी व्यक्त केली. झुकरबर्ग यांची काँग्रेससमोर प्रथमच साक्ष झाली. यावेळी त्यांनी 87 दशलक्ष वापरकर्त्यांच्या खासगी माहितीला सुरक्षित ठेवण्यात आणि फेसबुकचा गैरवापर रोखण्यात अपयश आल्याची जबाबदारी स्वीकारली. आमच्या जबाबदारीची व्यापक भूमिका काय हे आम्ही समजून घेतले नाही व ती मोठी चूक होती. ती माझी चूक होती, मी दिलगीर आहे,’ असे झुकरबर्ग यांनी लेखी साक्षीत म्हटले. निवडणुकीत विदेशांचा हस्तक्षेप झाला व द्वेषाच्या भाषणातही वापर झाला, असे झुकरबर्ग म्हणाले. फेसबुकच्या लक्षावधी वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा ब्रिटिश राजकीय सल्लागार कंपनी केंब्रिज अ‍ॅनालिटिकाकडून गैरवापर झाल्यामुळे मोठे वादळ निर्माण झाले आहे. झुकरबर्ग यांनी मीसुद्धा आदर्शवादी होतो व दोन अब्ज लोक जे माध्यम वापरतात त्याचा कसा गैरवापर व लबाडीसाठी केला जाऊ शकतो याचे आकलन होऊ शकले नाही, असे म्हटले आहे.

फेसबुकवर घडेल त्याला मी जबाबदार‘मी फेसबुक सुरू केले. ते मी चालवतो आणि येथे जे काही घडले त्याला मी जबाबदार आहे. त्या माहितीचा गैरवापर न होण्यासाठी आम्ही पुरेसे काही केले नाही हे तर स्पष्टच आहे. त्याचा खोट्या बातम्यांसाठी वापर झाला, असेही झुकरबर्ग म्हणाले़

टॅग्स :Cambridge Analyticaकेम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाFacebookफेसबुक