फ्लोरिडात हॉट योगा स्टुडियोमध्ये गोळीबार, हल्लखोरानं चौघांना जखमी करत स्वतःवर झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 07:21 IST2018-11-03T07:20:23+5:302018-11-03T07:21:00+5:30

अमेरिकेतल्या फ्लोरिडामधल्या कॅपिटल सिटीमध्ये एका हॉट योगा स्टुडिओमध्ये गोळीबार झाला आहे.

A bullet shot at Hatha Yoga studio in Florida, Hulkhoran injures four | फ्लोरिडात हॉट योगा स्टुडियोमध्ये गोळीबार, हल्लखोरानं चौघांना जखमी करत स्वतःवर झाडली गोळी

फ्लोरिडात हॉट योगा स्टुडियोमध्ये गोळीबार, हल्लखोरानं चौघांना जखमी करत स्वतःवर झाडली गोळी

फ्लोरिडा- अमेरिकेतल्या फ्लोरिडामधल्या कॅपिटल सिटीमध्ये एका हॉट योगा स्टुडिओमध्ये गोळीबार झाला आहे. एपीच्या वृत्तानुसार, हल्लेखोरानं गोळीबार करत चार जणांना जखमी केलं, त्यानंतर त्यानं स्वतःवरही गोळी झाडून घेतली. एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, गोळीबारीपूर्वी मी एका लांब दाढी असलेल्या व्यक्तीला हॉट योगा स्टुडिओच्या आत जाताना पाहिलं. गोळीबारानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तीन ते चार जण बाहेर येतानाही दिसली. तर हल्लेखोरानं स्वतःवर गोळी झाडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच हल्लेखोराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी सध्या तरी जखमींसंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. 





 

Web Title: A bullet shot at Hatha Yoga studio in Florida, Hulkhoran injures four