शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

एपस्टीन फाइल्समुळे पद गमावणारे जगातील पहिले पंतप्रधान? कीर स्टॉर्मर यांची खुर्ची धोक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:56 IST

एपस्टीन फाइल्समुळे ब्रिटनच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या एपस्टीन फाइल्समधून समोर आलेल्या धक्कादायक खुलास्यांमुळे ब्रिटनच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आता थेट ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टॉर्मर आले आहेत. त्यांच्याविरोधात आता सत्ताधारी लेबर पक्षातच असंतोष वाढला असून, स्टॉर्मर यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१८ महिन्यांतच मोठे संकट

कीर स्टॉर्मर यांना पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतून अवघे १८ महिने झाले असतानाच हे प्रकरण त्यांच्या नेतृत्वासाठी सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. एपस्टीन फाइल्समधील खुलाशांनंतर लेबर पक्षातील अनेक खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, स्टॉर्मर यांचे चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्वीनी यांनी ८ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला.

स्टॉर्मर यांचा संबंध काय?

कीर स्टॉर्मर यांचे नाव थेट एपस्टीन फाइल्समध्ये नसले तरी, त्यांनी नियुक्त केलेल्या एका वरिष्ठ नेत्यामुळे त्यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्टॉर्मर यांनी पीटर मॅंडेलसन यांची अमेरिकेतील ब्रिटनचे राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. मॅंडेलसन यांचे जेफ्री एपस्टीनशी घनिष्ठ संबंध असल्याचे आधीपासूनच माहित होते. ही नियुक्ती करण्याची शिफारस स्टॉर्मर यांचे तत्कालीन चीफ ऑफ स्टाफ मॉर्गन मॅकस्वीनी यांनी केल्याचे उघड झाले असून, याच कारणामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला.

नव्या फाइल्समधून गंभीर आरोप

जानेवारी २०२६ मध्ये अमेरिकेच्या न्याय विभागाने जाहीर केलेल्या नव्या एपस्टीन फाइल्समधून धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार, पीटर मॅंडेलसन यांनी २००८-०९ च्या जागतिक आर्थिक संकटाच्या काळात एपस्टीनला संवेदनशील माहिती पुरवली होती. त्यांनी एपस्टीनकडून आर्थिक लाभही घेतल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, २००८ मध्ये एपस्टीनला शिक्षा झाल्यानंतरही मॅंडेलसन यांची त्याच्याशी मैत्री सुरूच होती.

चौकशी, छापे आणि राजकीय परिणाम

या नव्या खुलाशांनंतर ब्रिटिश पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला आहे. मॅंडेलसन यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. सार्वजनिक पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या दृष्टीने चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मॅंडेलसन यांनी लेबर पार्टीचा राजीनामा दिला असून, ते हाउस ऑफ लॉर्ड्समधूनही बाहेर पडले आहेत. सध्या त्यांना अटक झालेली नाही किंवा औपचारिक आरोप दाखल झालेले नाहीत. तसेच, त्यांच्यावर कोणताही लैंगिक गैरवर्तनाचा आरोपही नाही. मात्र, दोष सिद्ध झाल्यास या प्रकरणात आजीवन कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

स्टॉर्मर यांची माफी आणि बचाव

या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान कीर स्टॉर्मर यांनी एपस्टीनच्या पीडितांची जाहीर माफी मागितली आहे. 'मी मॅंडेलसन यांच्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवला. ही नियुक्ती चुकीची होती,' असे स्टॉर्मर यांनी मान्य केले. तसेच, मॅंडेलसन यांच्या नियुक्तीशी संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

लेबर पार्टीत फूट, विरोधक आक्रमक

या प्रकरणामुळे लेबर पार्टीत तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. वरिष्ठ खासदार एमिली थॉर्नबेरी यांनी मॅकस्वीनी यांना वादग्रस्त व्यक्ती म्हटले असून, त्यांच्या जाण्यामुळे पक्षाला नव्याने विश्वास निर्माण करण्याची संधी मिळेल, असे मत व्यक्त केले आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, मॅकस्वीनी यांच्या राजीनाम्यामुळे स्टॉर्मर अधिक एकटे आणि कमजोर झाले आहेत. 

एपस्टीन फाइल्समुळे खुर्ची जाणार?

मीडिया आणि राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा आहे की, कीर स्टॉर्मर यांना राजीनामा द्यावा लागेल. तसे झाल्यास, एपस्टीन फाइल्समुळे पद गमावणारे ते जगातील पहिले पंतप्रधान ठरू शकतात. आर्थिक वाढ, महागाई नियंत्रण आणि सार्वजनिक सेवा सुधारण्याची आश्वासने पूर्ण करण्यात आधीच अडचणीत असलेल्या स्टॉर्मर यांच्यासाठी हे प्रकरण त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे राजकीय संकट मानले जात आहे. ब्रिटनच्या राजकारणात पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Epstein Files Scandal: Could UK Prime Minister Starmer Lose His Position?

Web Summary : Epstein files implicate UK PM Starmer via a controversial appointment. Resignations and investigations follow, threatening his leadership and potentially making him the first PM to fall due to the scandal.
टॅग्स :United Kingdomयुनायटेड किंग्डमInternationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी