शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश संसदेचं ब्रेक्झिट कराराविरोधात मतदान; पंतप्रधान थेरेसा मे यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 07:28 IST

ब्रेक्झिटची प्रक्रिया आणखी लांबणार

लंडन: ब्रिटिश संसदेनं ब्रेक्झिट कराराविरोधात मतदान केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान थेरेसा मे यांना मोठा धक्का बसला आहे. ब्रेक्झिट कराराविरोधात तब्बल 432 सदस्यांनी मतदान केलं. तर 202 सदस्यांनी ब्रेक्झिटच्या बाजूनं कौल दिला. त्यामुळे ब्रिटनला युरोपियन युनियनपासून दूर होण्यास आणखी  कालावधी लागू शकतो. हा परिस्थितीत पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्कीदेखील ओढावू शकते. ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी 29 मार्चपर्यंतची मुदत निश्चित केली होती. याला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. मात्र ब्रेक्झिटबद्दलचा प्रस्ताव ब्रिटिश संसदेनं संमत केलेला नाही. त्यामुळे ब्रेक्झिटला आणखी काही काळ लागू शकतो. यासाठी आता ब्रिटनकडून युरोपियन युनियनकडे मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे. संसदेतील मतदानाआधीच पंतप्रधान थेरेसा मे यांना अपयशाची भीती सतावत होती. मे यांच्या पक्षातील अनेकांच्या मनात ब्रेक्झिट कराराबद्दल नाराजी आहे. त्यामुळेच मे यांनी गेल्या महिन्यात संसदेतलं मतदान टाळलं होतं. युरोपियन युनियनमधून बाहेर पडावं की नाही, याबद्दल 23 जून 2016 रोजी ब्रिटनमध्ये जनमताचा कौल घेण्यात आला. त्यात 51.9 टक्के लोकांनी बाहेर पडण्याच्या बाजूनं मत नोंदवलं. तेव्हापासून ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू झाली. गेल्या डिसेंबरमध्ये ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ कॉमन्स) या संदर्भात मतदान होणार होतं. मात्र पराभवाच्या भीतीनं पंतप्रधान मे यांनी मतदान पुढे ढकललं. यानंतर विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बेन यांनी पंतप्रधान मे यांना लक्ष्य केलं. खासदारांच्या शंका दूर करण्यात पंतप्रधानांना पूर्णपणे अपयश आल्याची टीका कॉर्बेन यांनी केली होती.  

टॅग्स :Theresa Mayथेरेसा मेEnglandइंग्लंड