लंडन - बँकांचे नऊ हजार कोटी रुपये थकवून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय माल्याल्या अजून एक धक्का बसला आहे. ब्रिटनमधील न्यायालयाने माल्याकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या 13 बँकांच्या समुहाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना माल्याच्या लंडनमधील घराची तपासणी करण्याची परवानगी दिली आहे. माल्यावर बँकांचे 9 हजार कोटी रुपये थकवल्याचा आरोप असून, ब्रिटनमधून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. माल्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी भारतीय तपास यंत्रणांकडून दाखल करण्याल आलेल्या याचिकेला माल्याकडून विरोध करण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटनमधील न्यायालयाने आज दिलेल्या निकालामुळे विजय माल्याच्या लंडनमधील हर्टफोर्डजवळच्या मालमत्तेमध्ये प्रवेश करून तेथील तपासणी करण्याची परवानगी यूके हायकोर्टाच्या प्रवर्तन अधिकाऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे अधिकारी आणि प्रतिनिधींना वेलविन परिसरातील तेविन या ठिकाणी असलेल्या लेडीवॉक आणि ब्रेंबल लॉजमधील माल्याच्या ठिकाणांमध्ये प्रवेश करता येणार आहे.
विजय माल्याच्या घराची तपासणी करण्यास ब्रिटनमधील न्यायालायने दिली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 21:26 IST