Canada School Shooting News: कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील टम्बलर रिज माध्यमिक शाळेत मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण गोळीबारात ९ जण ठार झाले असून सुमारे २७ जण जखमी झाले आहेत. या खळबळजनक घटनेनंतर हल्लेखोराने स्वत:वरही गोळी झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मंगळवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १:२० वाजता टम्बलर रिज माध्यमिक शाळेत एका अज्ञात इसमाने अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. माहिती मिळताच रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिसराचा ताबा घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या आवारात ६ जणांचे मृतदेह आढळले. एका जखमी व्यक्तीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. दोन व्यक्ती एका घरात मृतावस्थेत आढळल्या, ज्यांचा या घटनेशी संबंध असल्याचे मानले जात आहे. गोळीबारानंतर हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात एकूण २७ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींना प्राथमिक उपचार देऊन सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे शाळेबाहेर काढले आहे. ब्रिटीश कोलंबियाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. हल्लेखोराने हे कृत्य का केले? त्याच्या मागे नेमका काय हेतू होता? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Web Summary : A shooting at a British Columbia school in Canada left 10 dead and 25 injured. The gunman, who also died, opened fire at the school. Police are investigating the motive and have urged calm.
Web Summary : कनाडा के ब्रिटिश कोलंबिया के एक स्कूल में गोलीबारी में 10 लोगों की मौत हो गई और 25 घायल हो गए। हमलावर ने स्कूल में गोलीबारी की और बाद में उसकी भी मौत हो गई। पुलिस मामले की जांच कर रही है।