ब्रिटनने पकिस्तानला टाकले अतिधोकादायक देशांच्या यादीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 22:44 IST2021-04-14T22:42:02+5:302021-04-14T22:44:35+5:30
Britain puts Pakistan on the list of most dangerous countries :काही दिवसा अगोदर ब्रिटनने आपल्या देशातील कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी ‘रेड लिस्ट’ जारी केली होती.

ब्रिटनने पकिस्तानला टाकले अतिधोकादायक देशांच्या यादीत
दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरविणे आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणी करणार्या २१ देशाची यादी प्रसिद्ध करून ब्रिटनने या धोकादायक देशांच्या यादीत पाकिस्तानचा समावेश केला आहे. याच्या काही दिवसा अगोदर ब्रिटनने आपल्या देशातील कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी ‘रेड लिस्ट’ जारी केली होती. यात पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये येणार्यांवर निर्बंध टाकले होते. या दोन्ही गोष्टी म्हणजे पाकिस्तानला बसलेला मोठा धक्का असल्याचे मानले जाते. यामुळे पाकिस्तानचा कुणीही सन्मान करत नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा समोर आल्याचा आरडाओरडा पाकिस्तानमध्ये सुरू झाल आहे.
उत्तर कोरिया, इराण या देशांबरोबर बोटस्वाना, सेनेगल, झिंबाब्वे, निकारागुआ या २१ धोकादायक देशांच्या यादीतील पाकिस्तानचा समावेश करून ब्रिटनने कठोर निर्णय घेतला आहे. दरवर्षी ब्रिटनमध्ये जाणार्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या मोठी आहे. पाकिस्तान बर्याच कारणांसाठी ब्रिटनवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनकडून घेण्यात आलेला हा निर्णय पाकिस्तानच्या भवितव्यासाठी धक्कादायक ठरणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झईद हफीज चौधरी यांनी ब्रिटनचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठपका ठेवला.