Eight Wives Husband: हाच तो, आता पस्तावतोय! 9 तरुणींशी लग्न केले, एक सोडून गेली; आता तोटे सांगत फिरतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 15:23 IST2022-08-15T15:21:42+5:302022-08-15T15:23:01+5:30
Eight Wives Husband Arthur O Urso: ब्राझिलमध्ये बहुपत्नीत्व बेकायदेशीर आहे. यामुळे त्याचे हे लग्न अधिकृत नाहीय. लग्नावेळी आर्थर ओ उर्सोने एकच विवाह करण्याला आपला विरोध आहे, यामुळे मी ९ तरुणींशी लग्न केले असल्याचे सांगितले होते.

Eight Wives Husband: हाच तो, आता पस्तावतोय! 9 तरुणींशी लग्न केले, एक सोडून गेली; आता तोटे सांगत फिरतोय
काही महिन्यांपूर्वी एका ब्राझिलियन मॉडेल तरुणाने एकाच लग्न मंडपात ९ तरुणींशी लग्न करून अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. लग्नानंतर त्याला त्यातील एक पत्नी सोडून गेली होती. असे असले तरी आता तो आठ पत्नींसोबत राहतोय. पण आता त्याच्यावर पस्तावण्याची वेळ आली आहे.
ब्राझिलमध्ये बहुपत्नीत्व बेकायदेशीर आहे. यामुळे त्याचे हे लग्न अधिकृत नाहीय. लग्नावेळी आर्थर ओ उर्सोने एकच विवाह करण्याला आपला विरोध आहे, यामुळे मी ९ तरुणींशी लग्न केले असल्याचे सांगितले होते. तसेच त्याला फ्री लव्ह सेलिब्रेट करण्याची इच्छा आहे. आता याच आर्थरला संसार करणे कठीण होऊन बसले आहे.
आर्थरने सर्व तरुणींसोबत एकत्र राहण्यासाठी तसेच सेक्ससाठी एक टाईमटेबल बनविले होते. प्रत्येक पत्नीला वेळ देता यावा यासाठी त्याने असे केले होते. आता आर्थर लोकांना बहुपत्नी असल्यावरचे फायदे नाही तर तोटे सांगत फिरत आहे. 'जास्त पार्टनर असण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला शरीर संबंधांचे स्वातंत्र्य आहे. आम्ही आमचा वीकेंड खूप मजेत घालवतो. पण या गंमतीची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे खर्च. तरी आम्ही हा खर्च मॅनेज करत आहोत.', असे आर्थरने सांगितले.
जुन्या पिढीचे लोक त्यांच्या नात्याच्या विरोधात आहेत. पण त्याकडे तो फारसा लक्ष देत नाही. आम्हाला विरोध करणाऱ्यांना देखील केव्हातरी बहुपत्नीत्व हवे होते. रोस्टरचे काही तोटेही आहेत. कधीकधी एका पत्नीसोबत राहावेसे वाटत होते, पण रोस्टरमुळे तिसऱ्याच पत्नीसोबत रहावे लागले, असे तो म्हणतो.
मॉडेल लुआना कझाकीशी आर्थरने अधिकृतपणे लग्न केले आहे. नवरा आपल्याला वेळ वेळ देऊ शकत नाही, ही तिची तक्रार आहे. तरीही आपण या नात्यात खूश असल्याचे लुआना म्हणते. तसेच आर्थरला या कारणावरून सोडून दुसराच व्यक्ती पती म्हणून स्वीकारण्यास तयार नसल्याचेही तिने म्हटले आहे.