शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Brazil Rains & Landslides : हाहाकार! ब्राझीलमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनात 94 जणांचा मृत्यू; पुराची भीषणता दाखवणारा Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 11:06 IST

Brazil Rains & Landslides Death Toll Rises : रियो दि जनेरियो (Rio de Janeiro state) राज्यातील डोंगराळ भागात अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामुळे जवळपास 94 जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझीलला (Brazil) मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रियो दि जनेरियो (Rio de Janeiro state) राज्यातील डोंगराळ भागात अतिवृष्टीनंतर पूर आणि भूस्खलनामुळे जवळपास 94 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सकाळी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका पेट्रोपोलीस या ठिकाणाला बसला आहे, जिथे मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 

महापौर रुबेन्स बोम्टेम्पो यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मृतांची संख्या वाढू शकते. आतापर्यंत 21 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. वेगाने मदतकार्य सुरू आहे". याआधी 2011 मध्येही या भागात अतिवृष्टी झाली होती. पावसामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. बुधवारी मदत आणि बचाव कार्यादरम्यान, 49 वर्षीय रोसलिन विर्गिलिओ यांना अश्रू अनावर झाले. कारण ती ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेच्या वेदना विसरू शकले नाहीत. अडकलेल्या महिलेला ते वाचवू शकले नाहीत. 

"युद्धासारखी परिस्थिती"

"काल एक महिला मदतीसाठी ओरडत होती. मला इथून बाहेर काढा. पण, आम्ही काहीच करू शकलो नाही. पाणी आणि मातीचा ढिगारा खूप होता. दुर्दैवाने आमचे शहर उद्ध्वस्त झालं आहे" असं ते म्हणाले. गव्हर्नर क्लॉडियो कास्त्रो यांनी पत्रकारांना सांगितले की ही युद्धासारखी परिस्थिती आहे आणि बाधित भागातील ढिगारा साफ करण्यासाठी त्यांना शेजारील राज्यांकडून अवजड यंत्रसामग्रीसह सर्व शक्य मदत मिळत आहे. राज्याच्या अग्निशमन विभागाने मंगळवारी उशिरा एका निवेदनात सांगितले की, बचाव कार्यात 180 सैनिकांचा समावेश आहे.

80 हून अधिक घरं वाहून गेली असून अनेक जण बेपत्ता

जवळपास 80 हून अधिक घरं वाहून गेली असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. लोकं आपल्या बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या परिसरात एका दिवसात तीन तासांत 25.8 सेंटीमीटर पाऊस झाला, जो मागील 30 दिवसांच्या पावसाइतकाच आहे, असं म्हटलं आहे. रशियाच्या दौऱ्यावर असलेले ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी ट्विट केले की, त्यांनी आपल्या मंत्र्यांना पावसामुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Brazilब्राझीलRainपाऊस