रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 19:06 IST2025-12-14T19:04:21+5:302025-12-14T19:06:34+5:30
Bondi Beach shooting: ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात झालेल्या गोळीबारात किमान 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.

रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Bondi Beach shooting: ऑस्ट्रेलियात आज एक धक्कादायक घटना घडली. जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सिडनी शहरातील बॉन्डी बीच परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 10 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू मायकेल व्हॉन थोडक्यात बचावला.
बॉन्डी बीच परिसरात भीतीचे वातावरण
रविवारी बॉन्डी बीच परिसरात अचानक गोळीबार सुरू झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. घटनेनंतर संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
Being locked in a restaurant in Bondi was scary .. Now home safe .. but thanks so much to the emergency services and the guy who confronted the terrorist .. thoughts with all who have been affected .. xxx
— Michael Vaughan (@MichaelVaughan) December 14, 2025
मायकेल व्हॉन रेस्टॉरंटमध्ये लपला
या घटनेच्या वेळी मायकेल व्हॉन बॉन्डी बीच परिसरातच होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. व्हॉनने लिहिले, "बॉन्डीमधील एका रेस्टॉरंटमध्ये लपून बसणे हा अत्यंत भयावह अनुभव होता. सध्या मी पूर्णपणे सुरक्षित आहे. आपत्कालीन सेवांचे आणि त्या व्यक्तीचे आभार, ज्यांनी त्या हल्लेखोराला रोखले."
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
मायकेल व्हॉनची क्रिकेट कारकीर्द
2005 मध्ये मायकेलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने अॅशेस मालिका 2-1 ने जिंकली. त्याच्या नेतृत्वात इंग्लंड जागतिक क्रमवारीत अव्वल कसोटी संघ ठरला. 51 कसोटी सामन्यांत मायकेलने कर्णधारपद भूषवले असून, त्यात 26 विजय, 11 पराभव आणि 14 सामने अनिर्णित राहिले.
समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
नेमकी घटना काय?
सिडनी शहरातील बॉन्डी बीच परिसरा ज्यू समुदायातील तब्बल दोन हजार लोक आपल्या कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते. चाबाद या ज्यू संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजता अचानक दोन सशस्त्र हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकून धावपळ सुरू झाली. या घटनेत किमान 10 लोकांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले.