"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 13:34 IST2025-07-28T13:33:06+5:302025-07-28T13:34:24+5:30
एका आंतरराष्ट्रीय विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. एका प्रवाशाने विमानाचे उड्डाण होताच बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यास सुरुवात केली होती.

"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
ब्रिटनच्या ल्युटनहून ग्लासगोला जाणाऱ्या इझीजेटच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. एका प्रवाशामुळे वैमानिकाला ग्लासगो विमानतळावर विमान उतरवावे लागले. विमानातील एक प्रवासी अचानक विमानात मोठ्याने ओरडू लागला. यामध्ये त्या प्रवाशाने विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिली. "अल्लाहू अकबर, विमानात बॉम्ब आहे" 'अमेरिका मुर्दावाद' आणि 'ट्रम्प मुर्दावाद' असे नारे त्या प्रवाशाने देण्यास सुरूवात केली.
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
विमानाचे उड्डाण होताच तो प्रवासी वॉश रुममधून बाहेर आला. यावेळी त्याने विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत ओरडू लागला. अन्य प्रवाशांनी हे पाहून त्याला नियंत्रित केले. यानंतर, विमानात गोंधळ सुरू झाला. एटीसीशी संपर्क साधल्यानंतर, विमानाचे ग्लासगो विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सरकारविरोधी घोषणा देणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
विमानांचे दररोज आपत्कालीन लँडिंग होत आहेत
मागील अनेक दिवसांपासून दररोज कोणत्या ना कोणत्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले जात आहे. या महिन्यात २२ जुलै रोजी डलामन-एडिनबर्ग फ्लाइट EZY3282 चे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. डलामन (तुर्की) ते एडिनबर्गला जाणाऱ्या इझीजेट फ्लाइटला तांत्रिक बिघाडामुळे सोफिया (बल्गेरिया) येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. प्रवाशांसाठी रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली होती.
Bomb Threats Disrupt EasyJet Flight to Glasgow
— Sumit (@SumitHansd) July 27, 2025
An Islamist on an EasyJet flight, began chanting “There is a bomb on the plane! Death to America🇺🇸! Death to Trump! Allahu Akbar.” pic.twitter.com/5URTa0ySOI
२१ जुलै रोजी एअर इंडियाच्या कोची-मुंबई फ्लाइट AI-2744 चे अपघाती लँडिंग झाले. प्रत्यक्षात, कोचीहून मुंबईला जाणारे एअर इंडियाचे A320 विमान मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरले. विमान धावपट्टी २७ वरून बाहेर पडले आणि टॅक्सीवेवर थांबले, ज्यामुळे इंजिन खराब झाले. यापूर्वी १६ जुलै रोजी दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6 E 2176 चे एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईत आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
दिल्लीतून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे लँडिंग
८ जुलै रोजी ब्रिटनच्या F 35 B लढाऊ विमानाचे केरळमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ब्रिटनहून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या एका ब्रिटिश F 35 B लढाऊ विमानाचे इंधन कमी असल्याने तिरुअनंतपुरम येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमान सुमारे १५ दिवस विमानतळावरच राहिले. लॉकहीड मार्टिनच्या अभियंत्यांनी येऊन लढाऊ विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त केले.