Bomb Attack in Pakistan: पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या बसवर भीषण बॉम्ब हल्ला; 10 ठार, 39 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:58 PM2021-07-14T12:58:25+5:302021-07-14T12:58:54+5:30

bomb attack on Chinese engineer's bus in Pakistan: चिनी अभियंते जात असलेली बस रस्त्याशेजारी लपविण्यात आलेल्या स्फोटकांनी उडवून देण्यात आली. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला ठरवून केल्याचे दिसत आहे.

bomb attack on Chinese engineer's bus in Pakistan; at least 10 killed, 39 injured | Bomb Attack in Pakistan: पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या बसवर भीषण बॉम्ब हल्ला; 10 ठार, 39 जखमी

Bomb Attack in Pakistan: पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या बसवर भीषण बॉम्ब हल्ला; 10 ठार, 39 जखमी

Next

इस्लामाबाद: पाकिस्तानमध्येचीनच्या इंजिनिअरांना (attack on Chinese engineer's in Pakistan) घेऊन जात असलेल्या बसवर मोठा बॉम्ब हल्ला (Bomb Attack) करण्यात आला आहे. यामध्ये कमीतकमी 10 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सहा चिनी नागरिक आहेत. महत्वाचे म्हणजे या बसमध्ये 36 चिनी नागरिक प्रवास करत होते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (At least 10 people, including at least six Chinese nationals and one Pakistani soldier, were killed in a blast targeting a bus in a remote region of northern Pakistan on Wednesday)

चिनी अभियंते जात असलेली बस रस्त्याशेजारी लपविण्यात आलेल्या स्फोटकांनी उडवून देण्यात आली. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला ठरवून केल्याचे दिसत आहे. चीन -पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक भाग असलेल्या दासू बंधाऱ्याच्या बांधकामासाठी (Dasu hydroelectric project) चीनचे इंजिनिअर आणि कामगार या बसमधून निर्माण स्थळी जात होते. त्यांच्यासोबत पाकिस्तानचे दोन सैनिकही होते. या दोन्ही सैनिकांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे. सर्व जखमी आणि मृतांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाने या स्फोटाची चौकशी सुरु केली आहे. 
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वरच्या बाजुच्या कोहिस्तानमध्ये चिनी इंजिनिअरांना घेऊन जाणाऱ्या बसमध्ये स्फोट झाला आहे. काही लोकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले की, कमीत कमी 10 लोक मारले गेले आहेत. तर 39 लोक जखमी झाले आहेत. अद्याप स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. 

कोहिस्तानचे उपायुक्त आरिफ खान यांनी सांगितले की, हा हल्ला सकाळी 7.30 वाजता झालाआहे. सर्व चिनी कर्मचाऱ्यांना जलविद्युत प्रकल्पाकडे नेले जात होते. या बसमध्ये चिनी कर्माऱ्यांसह सुरक्षा रक्षक आणि कामगार होते. बचाव कार्य सुरु आहे. पोलिसांनी आणि सैन्याने सर्व भाग घेरला आहे. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. 

काल पाकिस्तानी लष्करावर दहशतवादी हल्ला

पाकिस्तानच्या खैबर पख्युतख्वा प्रांतात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कॅप्टन अब्दुल बासित यांच्यासह ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही सैनिकांना ओलीस ठेवल्याची माहितीदेखील समोर येत आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं (टीटीपी) हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे.

Web Title: bomb attack on Chinese engineer's bus in Pakistan; at least 10 killed, 39 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.