पेशावरमधील बॉलीवूड वारसा होणार जतन, कपूर हवेलीचा जीर्णोध्दार होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 01:49 AM2020-11-01T01:49:56+5:302020-11-01T06:18:22+5:30

Bollywood heritage in Peshawar : १९८८ मध्ये ऋषी कपूर आणि रणधीर कपूर हे बंधूद्वय पाकिस्तानात आले होते, तेव्हा त्यांनी आपल्या वडिलोपार्जित घराला भेट दिली होती. याच्या आठवणी आजही शहरात काढल्या जातात.

The Bollywood heritage in Peshawar will be preserved, the Kapoor mansion will be renovated | पेशावरमधील बॉलीवूड वारसा होणार जतन, कपूर हवेलीचा जीर्णोध्दार होणार

पेशावरमधील बॉलीवूड वारसा होणार जतन, कपूर हवेलीचा जीर्णोध्दार होणार

Next

पेशावर : बॉलीवूडमधील कपूर घराणे आणि दिलीपकुमार यांची वडिलोपार्जित घरे उत्तर पाकिस्तानातील पेशावर शहरात असून, हा अनोखा वारसा जतन करण्यासाठी तेथील सरकारने पावले उचलली आहेत. 
१९८८ मध्ये ऋषी कपूर आणि रणधीर कपूर हे बंधूद्वय पाकिस्तानात आले होते, तेव्हा त्यांनी आपल्या वडिलोपार्जित घराला भेट दिली होती. याच्या आठवणी आजही शहरात काढल्या जातात.
पेशावरच्या ढाकी मुनवर शाह परिसरात कपूर घराण्याची हवेली आहे. ही एकेकाळी शहरातील सर्वांत उंच इमारत होती. याच हवेलीत १९२४ मध्ये राज कपूर यांचा जन्म झाला. कपूर हवेलीपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर दिलीपकुमार यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरात १९२२ मध्ये दिलीपकुमार यांचा जन्म झाला. कपूर हवेली पारंपरिक पेशावर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मूळ सहामजली असलेल्या या हवेलीचे आता चारच मजले मोडक्यातोडक्या अवस्थेत शिल्लक आहेत.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या सरकारने ही दोन्ही घरे खरेदी करण्याचा तसेच त्यांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय गेल्याच महिन्यात घेतला आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानात बॉलिवूड चित्रपटांवर बंदी आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला होता, तेव्हा ही बंदी पाक सरकारने  तली होती. खैबर पख्तुनख्वा प्रांताच्या पुरातत्त्व व संग्रहालये विभागाचे संचालक अब्दुल समद यांनी सांगितले की, आम्ही पेशावरला भारत आणि मध्य आशियाला जोडणारा दुवा म्हणून विकसित करू इच्छितो. हे दोन महान अभिनेते पाकिस्तानातील पेशावर येथून भारतात गेले आणि मोठे स्टार झाले, हे वास्तव आम्ही प्रकाशात आणू इच्छितो. 

जागतिक पर्यटन केंद्र बनविणार
2,500 वर्षांचा बहुसांस्कृतिक इतिहास पेशावरचा आहेे. दुर्दैवाने आम्हाला अस्थिरतेत ढकलण्यात आले. 
आम्ही पेशावरचे पुनरुज्जीवन करून जागतिक पर्यटन केंद्र बनवू इच्छितो. 

- ही दोन्ही घरे एका खाजगी व्यक्तीला विकली गेली होती. ही पाडण्याची या व्यक्तीची योजना होती. तथापि, पुरातत्त्व विभागाने २०१६ च्या पुरातत्त्व कायद्यान्वये त्याला स्थगिती दिली आहे. आता सरकार ही घरे खरेदी करणार आहे.

Web Title: The Bollywood heritage in Peshawar will be preserved, the Kapoor mansion will be renovated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.