अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 06:06 IST2025-07-28T06:05:02+5:302025-07-28T06:06:43+5:30

अहमदाबादेत १२ जून रोजी याच कंपनीच्या विमानाचा अपघात होऊन २७० जण ठार झाले होते.

boeing plane catches fire in america 173 passengers escape landing gear malfunction flights halted | अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

डेनव्हर: अमेरिकेच्या डेनव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला. सुदैवाने यातील १७३ प्रवासी व ६ क्रू सदस्य बालंबाल बचावले. अहमदाबादेत १२ जून रोजी याच कंपनीच्या विमानाचा अपघात होऊन २७० जण ठार झाले होते.

अमेरिकन एअरलाईन्सचे बोइंग ७३७ मॅक्स ८ विमानाचे लँडिंग गिअर फेल झाल्यामुळे उड्डाण रोखण्यात आले. याच कालावधीत विमानाच्या मागील बाजूस आग लागली. विमानातील सर्वजण इमर्जन्सी स्लायडरद्वारे सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे विमान मियामीला जात असताना हा प्रकार घडला. ही घटना भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी पहाटे २:१५ वाजता घडली.

विमानातून बाहेर पडताना ६ जण किरकोळ जखमी झाले. यातील एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) व एअरलाइन्सने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.

मार्चमध्येही लँडिंगच्या घडल्या घटना आपत्कालीन

यापूर्वी मार्चमध्येही डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकन एअरलाईन्सच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. इंजिनाशी संबंधित समस्येमुळे हा प्रकार घडला होता. या घटनेच्या २४ तास आधी साऊथवेस्ट फ्लाईट १४९६ ला कॅलिफोर्नियाच्या बरबँकहून लास वेगासला जाताना हवेत टक्कर टाळण्यासाठी नोज ड्रॉप करावे लागले होते. यामुळे प्रवासी त्यांच्या सीटवरून उडून छताला धडकले होते.

विमानाची आग आटोक्यात

विमानात लागलेली आग अग्निशमन पथकाने नियंत्रणात आणली. विमान सध्या सेवेतून हटविण्यात आले आहे. प्रवाशांना मियामीला नेण्यासाठी अन्य विमानाची व्यवस्था करण्यात आली. दुपारी विमानतळावर एअरपोर्ट ग्राऊंड स्पॉट लागू करण्यात आला होता. यामुळे ८७ विमानांची ये-जा प्रभावित झाली. नंतर विमानतळावरील कामकाज सुरळीत सुरू झाले. (वृत्तसंस्था)

 

Web Title: boeing plane catches fire in america 173 passengers escape landing gear malfunction flights halted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.