रक्तपिपासू इंग्रज अधिकारी! हजारो भारतीयांना गुलाम बनविले अन् येल विद्यापीठाची स्थापना केली, मागितली माफी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 01:07 PM2024-02-19T13:07:06+5:302024-02-19T13:07:31+5:30

अधिकारी एवढा भ्रष्टाचारी होता की त्याने भारतीयांना गुलाम प्रचंड त्रास देऊन काळी कमाई केली होती. त्या पैशातून त्याने हे विद्यापीठ उभे केले होते.

Bloodthirsty British officer! Enslaved thousands of Indians and founded Yale University, apologized | रक्तपिपासू इंग्रज अधिकारी! हजारो भारतीयांना गुलाम बनविले अन् येल विद्यापीठाची स्थापना केली, मागितली माफी 

रक्तपिपासू इंग्रज अधिकारी! हजारो भारतीयांना गुलाम बनविले अन् येल विद्यापीठाची स्थापना केली, मागितली माफी 

जगप्रसिद्ध येल विद्यापीठाने आता भारतीयांच माफी मागितली आहे. या विद्यापीठाची स्थापना भारतीयांचे रक्त शोषून करण्यात आली होती. एका इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले. हा अधिकारी एवढा भ्रष्टाचारी होता की त्याने भारतीयांना गुलाम प्रचंड त्रास देऊन काळी कमाई केली होती. त्या पैशातून त्याने हे विद्यापीठ उभे केले होते. आता येल विद्यापीठाने यावर माफी मागितली आहे. 

एलिहू येल या इंग्रज अधिकाऱ्याला मद्रासला अध्यक्ष म्हणून भारतात पाठविण्यात आले होते. तो एवढा सनकी होता की त्याने घोड्याला पळवून नेणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्याला फाशी दिली होती. मद्रासचा गव्हर्नर असताना त्याने प्रचंड काळा पैसा गोळा केला, त्यातील 800 पाउंड त्याने अमेरिकेला पाठविले होते. एका इमारतीला त्याला त्याचे नाव द्यायचे होते. हीच ती येल युनिव्हर्सिटी. 

ही इमारत कॉलेजमध्ये रुपांतरीत झाली, पुढे तिचे विद्यापीठ झाले. आज विद्यापीठाला याची लाज वाटत आहे. असे लोक या विद्यापीठाच्या स्थापनेत सहभागी होते ज्यांनी मेंढ्या-बकऱ्यांप्रमाणे माणसांची खरेदी-विक्री केली होती. सुमारे तीन शतकांनंतर, विद्यापीठाने गुलामगिरीशी जोडल्या गेलेल्या त्या संबंधाबद्दल माफी मागितली आहे. 

आम्ही आमच्या विद्यापीठाचा ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि गुलामगिरीशी संबंध असल्याचे मान्य करतो, तसेच आमच्या विद्यापीठाच्या संपूर्ण इतिहासात गुलाम बनलेल्या लोकांचे श्रम, अनुभव आणि योगदान ओळखतो. आमच्या येलच्या प्रमुखांनी या गुलामगिरीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, असे येल विद्यापीठाने म्हटले आहे. 

Web Title: Bloodthirsty British officer! Enslaved thousands of Indians and founded Yale University, apologized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.