बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:43 IST2025-12-30T15:34:21+5:302025-12-30T15:43:19+5:30
बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने हल्ल्यांच्या मालिकेत १० पाकिस्तानी लष्करी जवानांना ठार मारल्याचा दावा केला आहे.

बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने पाकिस्तान सैन्यावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये १० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केला आहे. बीएलएफने झाओ, बरखान, तुम्प आणि तुर्बत येथे अनेक हल्ले केले. यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे १० सदस्य मारले गेले. बलुच सशस्त्र गटांनी किमान १५ सैनिकांना ठार मारल्याच्या कृत्यांची जबाबदारी स्विकारली.
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
'बीएलएफच्या सैनिकांनी २८ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता आवारन जिल्ह्यातील झाओ भागात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात लष्कराच्या पायदळ गस्ती पथकाला, बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला आणि पिकअप ट्रकला लक्ष्य करण्यात आले होते, हे सर्व एकाच ठिकाणी होते. बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात शत्रूचे आठ सैनिक जागीच ठार झाले आणि तीन जण गंभीर जखमी झाले, असे बीएलएफचे प्रवक्ते मेजर गोहराम बलोच म्हणाले.
ताफ्याच्या संरक्षणासाठी तैनात केलेले एक चिलखती वाहन हल्ल्यादरम्यान मागे हटले आणि मृतदेह आणि जखमी सैनिक मागे सोडले. त्या रात्री बरखान जिल्ह्यातील राखनीजवळील स्राती-टिक परिसरातील एका लष्करी छावणीला लक्ष्य करून दुसरा हल्ला करण्यात आला, असा दावाही त्यांनी केला.
दहशतवाद्यांनी रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडसह जड शस्त्रांचा वापर केला, यामुळे आरपीजी शेल छावणीच्या आत पडल्याने दोन जवानांचा मृत्यू झाला आणि एक जखमी झाला. बीएलएफने सांगितले की, तिसरा हल्ला २८ डिसेंबर रोजी तुम्पच्या गोमाजी भागात करण्यात आला, तिथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या चौकीवर अनेक गोळ्या झाडल्या, यामुळे तेथे तैनात पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान झाले.