blast in afghanistan jalalabad city10 died | अफगाणिस्तानात सेनेच्या वाहनाजवळ बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानात सेनेच्या वाहनाजवळ बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू

 काबूलः अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. जलालाबाद शहरात एक मोठा बॉम्बस्फोट झाला असून, यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या हल्ल्यात 27 जण जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्ब एका रिक्षातून आणण्यात आला होता आणि ती रिक्षा सेनेच्या वाहनाजवळ नेऊन स्फोट घडवून आणला. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अद्यापही या हल्ल्याची कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही.

 


Web Title: blast in afghanistan jalalabad city10 died
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.