ऑपरेशननंतर महिलेच्या पोटात होत होती हालचाल, सत्य जेव्हा कळालं तेव्हा सर्वांनाच बसला झटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 19:12 IST2023-01-04T19:10:57+5:302023-01-04T19:12:12+5:30
एका महिलेच्या ओव्हरीमध्ये (अंडाशय) त्रास जाणवत होता त्यामुळे तिचं ऑपरेशन केलं गेलं. पण ऑपरेशनच्या ५ दिवसांनंतर महिलेला पोटात काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवू लागलं.

ऑपरेशननंतर महिलेच्या पोटात होत होती हालचाल, सत्य जेव्हा कळालं तेव्हा सर्वांनाच बसला झटका!
एका महिलेच्या ओव्हरीमध्ये (अंडाशय) त्रास जाणवत होता त्यामुळे तिचं ऑपरेशन केलं गेलं. पण ऑपरेशनच्या ५ दिवसांनंतर महिलेला पोटात काहीतरी हालचाल होत असल्याचं जाणवू लागलं. त्यामुळे महिला पुन्हा डॉक्टरांकडे गेली. तपासणी केल्यानंतर एक अशी गोष्ट समोर आली की ज्यानं ती महिला आणि सर्वांनाच धक्का बसला.
मेट्रो यूकेच्या माहितीनुसार ही घटना ब्रिटनच्या पूर्व लंडन भागातील आहे. ४९ वर्षीय महिलेनं तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला आहे. काही वर्षांपूर्वी महिलेच्या ओव्हरीचं ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसांनी महिलेला पोटात काहीतरी गडबड असल्यासारखं जाणवू लागलं. जेव्हा पुन्हा रुग्णालयात जाऊन चाचणी करण्यात आली तेव्हा लक्षात आलं की ऑपरेशनवेळी तिच्या पोटात ब्लेडचा तुकडा राहिला होता. या ब्लेडचा वापर सर्जनकडून ऑपरेशन करतेवेळी करण्यात आला होता. रिपोर्टनुसार ब्रिटनमध्ये सर्जरीवेळी रुग्णांच्या पोटात अनेकदा काहीतरी वस्तू सर्जनकडून राहून गेल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत.
"ऑपरेशननंतर माझ्या पोटात काहीतरी गडबड असल्याचं मला जाणवत होतं. ऑपरेशनवेळी ज्या ब्लेडचा वापर करण्यात आला होता त्याचा तुकडा पोटात राहिल्याचं नंतर लक्षात आलं. खूप रक्त वाहून गेलं होतं. मला खूप दुखत होतं", असं पीडित महिलेनं सांगितलं. ब्लेडचा तुकडा ऑपरेशननंतर जवळपास पाच दिवस तिच्या पोटातच होता. घटना लक्षात आल्यानंतर तिला पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आणि आणखी दोन आठवडे रुग्णालयात काढावे लागले. त्यानंतर पुन्हा सर्जरी करावी लागी आणि ब्लेडचा तुकडा बाहेर काढावा लागला.