शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अशी दिसेल जगातील पहिली बिटकॉईन सिटी, अल साल्वाडोरनं जारी केलं डिझाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 3:50 PM

Bitcoin City: अल साल्वाडोरनं गेल्या वर्षी बिटकॉईनला अधिकृत चलनाच्या रुपात मान्यता दिली आहे.

Bitcoin City: मध्य अमेरिकेतील सर्वात लहान देश अल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी बांधकाम सुरू असलेल्या बिटकॉइन शहराचे डिझाइन जारी केले आहे. विकासाचे हे नवे रुप अतिशय सुंदर असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. अध्यक्ष बुकेले यांनी सोशल मीडियावर क्रिप्टो शहराच्या मॉडेलचे फोटो शेअर केले आहेत. या शहराची निर्मिती फॉन्सेकाच्या खाडीवर कोंचगुआ ज्वालामुखीच्या जवळ केली जाणार आहे.

बिटकॉईन सिटी ही अल साल्वाडोरच्या राष्ट्रपतींच्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. याची घोषणा त्यांनी पहिल्यांदा सहा महिन्यांपूर्वी लॅटिन अमेरिकन बिटकॉईन आणि ब्लॉकचेन कार्यक्रमादरम्यान केली होती. सध्या क्रिप्टो बाजारात मंदी सुरू आहे आणि गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत ते आपल्या उच्चांकी पातळीपासून ५० टक्क्यांपर्यंत घसरले आहे. अशा वेळी हे डिझाइन समोर आलं आहे.या वर्षाच्या अखेरीस बांधकाम सुरू होण्याची शक्यता या वर्षाच्या अखेरीस बिटकॉइन सिटीचे बांधकाम सुरू होईल, असा अंदाज अल साल्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष नायब बुकेले यांनी व्यक्त केला आहे. बुकेले यांनी क्रिप्टो-सक्षम शहराचे स्केल मॉडेल आणि काही डिझाइन सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बिटकॉईनला मान्यता देणारा पहिला देशअल साल्वाडोरने सप्टेंबर महिन्यात बिटकॉईनला कायदेशीररित्या मान्यता दिली होती. असं करणारा तो पहिला देश ठरला होता. या देशानं क्रिप्टोमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या शहरात राहणाऱ्या लोकांना केवळ वॅट द्यावा लागेल. याचाच अर्थ या ठिकाणी कधीही इन्कम टॅक्स लागणार नाही. हे शहर पूर्णपणे बनून कधी तयार होईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

टॅग्स :BitcoinबिटकॉइनCryptocurrencyक्रिप्टोकरन्सी