शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांनाही होते जांभईची लागण

By admin | Updated: May 30, 2015 23:34 IST

एका व्यक्तीला जांभई आली की तिची लागण होऊन दुसऱ्यालाही जांभई येते हे आपल्याला माहिती आहे; परंतु अशी जांभईची लागण फक्त सस्तन प्राण्यांमध्येच होते असे नाही,

न्यूयॉर्क : एका व्यक्तीला जांभई आली की तिची लागण होऊन दुसऱ्यालाही जांभई येते हे आपल्याला माहिती आहे; परंतु अशी जांभईची लागण फक्त सस्तन प्राण्यांमध्येच होते असे नाही, तर पक्ष्यांच्या काही जातींमध्येही ती पसरते, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जांभईची लागण मानव, पाळलेली कुत्री, चिंपांझी, उंदीर, घूस व सशासारख्या सस्तन जिवांनाच होते असे समजले जात होते. सस्तनेतर जिवांमध्येही जांभईची लागण होते याचा पहिला पुराव्यासह प्रयोग करण्यात आला, असे स्टेट युनिव्हर्सिटी आॅफ न्यूयॉर्कच्या या अभ्यासाचे नेते अँड्र्यू गॅलप यांनी सांगितले. असाच प्रयोग याआधी पाळलेल्या छोट्या हिरव्या आॅस्ट्रेलियन पोपटांच्या थव्यावर पण करण्यात आला होता.गॅलप यांनी १६ पक्ष्यांना जोडीजोडीने जवळजवळच्या पिंजऱ्यात ठेवले. ते एकमेकांना पाहू शकतील व एकमेकांना दिसणार नाहीत अशा दोन्ही अवस्थेत त्यांना ठेवले होते. पक्षी एकमेकांना पाहू शकतात तेव्हा ते जांभई देतात. दुसऱ्या प्रयोगात त्यांना हे छोटे हिरवे आॅस्ट्रेलियन पोपट जांभई देताना व जांभई न देतानाचा पाच मिनिटांचा व्हिडिओ दाखविण्यात आला. तेव्हा पक्षी एकमेकांना पाहू शकत नव्हते त्या तुलनेत ते एकमेकांना पाहू शकत होते त्यावेळी त्यांनी त्या पाच मिनिटांत तीन वेळा जांभई दिली. या जांभया म्हणजे ते पक्षी काळजीत होते किंवा तणावात होते म्हणून नव्हत्या. जांभईचा हा प्रतिसाद एकमेकांच्या भावना जाणून घेण्याचा होता, असे गॅलप यांनी सांगितले.