शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

bird flu : आता मानवामध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग, चीनमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:39 IST

Bird flu: जागतिक स्तरावर H10N3 पासून मानवी संसर्गाची इतर कोणतीही घटना नोंदली गेलेली नाही, असे चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देझेंजियांग शहरातील 41 वर्षीय व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूचा स्ट्रेन आढळला, सध्या या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर आहे.

चीनमध्ये एक व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी सांगितले की, चीनने देशातील पूर्व जिआंगसू प्रांतात बर्ड फ्लूच्या  H10N3 स्ट्रेनसह मानवी संसर्गाची पहिली घटना नोंदविली आहे. झेंजियांग शहरातील 41 वर्षीय व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूचा स्ट्रेन आढळला, सध्या या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर आहे. (china reports first human case of h10n3 bird flu)

28 मे रोजी रुग्णामध्ये H10N3 एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूचे निदान झाले. या व्यक्तीला बर्ड फ्लूच्या H10N3 स्ट्रेनचा संसर्ग कसा झाला, हे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी जागतिक स्तरावर H10N3 पासून मानवी संसर्गाची इतर कोणतीही घटना नोंदली गेलेली नाही, असे चीनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

H10N3, बर्ड फ्लू विषाणूचा एक कमी रोगजनक किंवा तुलनेने कमी गंभीर स्ट्रेन आहे आणि व्यापक प्रसार होण्याचा धोका खूप कमी आहे. चीनमध्ये एव्हियन इन्फ्लूएंझाचे विविध स्ट्रेन आहेत आणि काही तुरळक लोकांना संक्रमित करतात, सामान्यत: जे पोल्ट्रीचा व्यवसाय करतात.

H5N8 इन्फ्लूएंझा ए विषाणूचा (याला बर्ड फ्लू विषाणू देखील म्हणतात) एक उपप्रकार आहे. H5N8 हा मानवासाठी कमी धोका दर्शवितो, तर  वन्य पक्षी आणि कोंबड्यांसाठी अत्यंत प्राणघातक आहे. एप्रिलमध्ये ईशान्य चीनमधील शेनयांग शहरातील जंगली पक्ष्यांमध्ये अति रोगजनक H5N6 एव्हियन फ्लू आढळला होता.

1997 मध्ये H5N1 चे पहिले प्रकरण समोर आले होते बर्ड फ्लू पसरविण्यासाठी बरेच विषाणू जबाबदार आहेत. पण यामध्ये  H5N1 धोकादायक मानला जातो. कारण हा विषाणू मानवांमध्ये बर्ड फ्लूचा वाहक म्हणून काम करतो आणि त्यांचा बळी घेतो. मानवांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची पहिली घटना 1997 मध्ये आली होती. ज्यावेळी हाँगकाँगमध्ये  कोंबडीपासून एका व्यक्तीमध्ये या विषाणूचा संसर्ग झाला होता.

2003 पासून बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव चीन, युरोप, आफ्रिका या देशांसह आशियाच्या बर्‍याच देशांमध्ये दिसून आला. चीनमध्ये 2013 साली बर्ड फ्लूचा संसर्ग एका व्यक्तीमध्ये आढळला होता. दरम्यान, WHO चा दावा आहे की, बर्ड फ्लू सहसा मानवांमध्ये संक्रमित किंवा परिणाम करीत नाही. मात्र, आता बर्ड फ्लूच्या H10N3 स्ट्रेनचे नवीन प्रकरण समोर आले आहे.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूchinaचीनHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या