इमारतीच्या बाल्कनीत बिकिनीमध्ये दिसली महिला, लोकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवल्या आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:23 IST2026-01-23T16:22:17+5:302026-01-23T16:23:59+5:30

पाकिस्तानातील लाहोरमधील बहरिया टाऊन येथे एक अजब घटना घडली... बिकिनी परिधान करून इमारतीच्या बाल्कनीत उभा राहिल्याचे पाहून लोकांनी रस्त्यातच गाड्या थांबवल्या आणि त्यानंतर काय केले पाहा...

Bikini-clad Woman in Lahore Balcony Causes Massive Traffic Jam in Bahria Town; Crowds Gather to Catch a Glimpse | इमारतीच्या बाल्कनीत बिकिनीमध्ये दिसली महिला, लोकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवल्या आणि...

इमारतीच्या बाल्कनीत बिकिनीमध्ये दिसली महिला, लोकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवल्या आणि...

पाकिस्तानातील लाहोरमधील बहरिया टाऊन परिसरात एका अजब घटनेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. एका इमारतीच्या बाल्कनीत एक महिला आपल्या पतीसोबत बिकिनी परिधान करून उभी असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. महिलेला पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यावरच गाड्या थांबवल्या आणि संबंधित महिलेचा व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. मात्र, त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

ही घटना लाहोरच्या मुख्य रस्त्यांपैकी एका ठिकाणी घडल्याने, वाहनचालकांनी आपली वाहने रस्त्यावरच उभी केली आणि बाल्कनीतील महिलेचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यास सुरूवात केली. मात्र, यामुळे काही वेळातच बहरिया टाऊनच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि स्थानिक प्रशासनाला ही गर्दी पांगवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली.

या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. पाकिस्तानसारख्या देशात, जिथे पेहरावाबाबत सामाजिक निकष अत्यंत कडक आहेत, तिथे महिला चक्क बिकिनी परिधान करून बाल्कनीत उभी राहिल्याने नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी याला वैयक्तिक स्वातंत्र्य म्हटले आहे. तर, काहींनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वागणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

Web Title : लाहौर में बिकनी में महिला को देख ट्रैफिक जाम

Web Summary : लाहौर में एक महिला को बिकनी में बालकनी में देखकर सड़क पर ट्रैफिक जाम लग गया। इस घटना ने पाकिस्तान में व्यक्तिगत स्वतंत्रता बनाम सार्वजनिक मानदंडों पर बहस छेड़ दी है।

Web Title : Woman in Bikini on Balcony Causes Traffic Jam in Lahore

Web Summary : A woman in a bikini on a Lahore balcony caused a traffic jam as onlookers stopped to record her. The incident sparked debate about personal freedom versus public norms in Pakistan.