सर्वात मोठा राजकीय धक्का! एपस्टीन प्रकरणाची धग ब्रिटनपर्यंत पोहचली, पंतप्रधानांचे पद धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 08:27 IST2026-02-10T08:26:07+5:302026-02-10T08:27:44+5:30

मुख्य सल्लागाराचा तडकाफडकी राजीनामा, हे संपूर्ण प्रकरण पीटर मँडेलसन यांच्या नियुक्तीभोवती फिरत आहे

Biggest political shock! Epstein case reaches Britain, Prime Minister post in danger | सर्वात मोठा राजकीय धक्का! एपस्टीन प्रकरणाची धग ब्रिटनपर्यंत पोहचली, पंतप्रधानांचे पद धोक्यात

सर्वात मोठा राजकीय धक्का! एपस्टीन प्रकरणाची धग ब्रिटनपर्यंत पोहचली, पंतप्रधानांचे पद धोक्यात

लंडन - बदनाम सेक्स रॅकेटचा सूत्रधार जेफ्री एपस्टीन प्रकरणाचे पडसाद आता ब्रिटनच्या सत्तेच्या केंद्रस्थानी उमटले असून पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात आले आहे. स्टार्मर यांचे सर्वांत विश्वासू आणि मुख्य सल्लागार मॉर्गन मॅकस्विनी यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

जुलै २०२४ मध्ये लेबर पार्टीला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मॅकस्विनी यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा स्टार्मर यांच्यासाठी मोठा वैयक्तिक आणि राजकीय धक्का मानला जात आहे.

वादाचे मूळ : पीटर मँडेलसन यांची नियुक्ती
हे संपूर्ण प्रकरण पीटर मँडेलसन यांच्या नियुक्तीभोवती फिरत आहे. मॅकस्विनी यांच्या सल्ल्यानुसार मँडेलसन यांची अमेरिकेतील ब्रिटनचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती.  मात्र, अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एपस्टीनच्या फाइल्समधून मँडेलसन मँडेलसन यांनी गोपनीय सरकारी माहिती एपस्टीनला पुरवल्याचाही आरोप आहे. नॉर्वेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी व जॉर्डनमधील नॉर्वेच्या राजदूत मोना जूल यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेफ्री एपस्टीनसोबत असलेल्या संबंधांच्या चौकशीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. 

Web Title : एपस्टीन कांड से ब्रिटेन में भूचाल: प्रधानमंत्री पद खतरे में

Web Summary : जेफ्री एपस्टीन कांड की आंच ब्रिटेन तक पहुंची, प्रधानमंत्री कीर स्टार्मर का पद खतरे में। पीटर मंडेलसन की नियुक्ति और एपस्टीन को जानकारी लीक करने के आरोपों के बीच एक प्रमुख सलाहकार ने इस्तीफा दे दिया। जॉर्डन में नॉर्वे के राजदूत ने भी एपस्टीन से संबंधों के चलते इस्तीफा दिया।

Web Title : Epstein Scandal Rocks UK: PM's Position in Jeopardy

Web Summary : The Jeffrey Epstein scandal has reached Britain, threatening Prime Minister Keir Starmer's position. A key advisor resigned amidst allegations involving Peter Mandelson's appointment as ambassador and leaked information to Epstein. Norway's ambassador to Jordan also resigned over Epstein ties.