मोठा दिलासा, नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती, कतारमधील कोर्टाचा निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 04:43 PM2023-12-28T16:43:33+5:302023-12-28T17:36:16+5:30

Qatar Court: कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांबाबत मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे.

Big relief, stay of death sentence awarded to 8 ex-Navy officers, court decision in Qatar | मोठा दिलासा, नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती, कतारमधील कोर्टाचा निर्णय  

मोठा दिलासा, नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती, कतारमधील कोर्टाचा निर्णय  

कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांबाबत मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. नौदलाच्या या आठ माजी अधिकाऱ्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेला कतारमधील एका न्यायालयाने स्थगिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या प्रकरणी करण्यात आलेल्या अपिलावर सुनावणी करताना कतारमधील कोर्टाने या अधिकाऱ्यांची शिक्षा कमी केली आहे. याबाबत सविस्तन निर्णयाची प्रतीक्षा आहे. तसेच आम्ही पुढील निर्णय घेण्यासाठी कायदेविषयक पथकासह या माजी सैनिकांच्या कुटुंबीयांशीची संपर्क साधून आहोत.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कतारमध्ये आमचे राजदूत आणि इतर अधिकारी पीडित अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांसह सुनावणीवेळी न्यायायलात उपस्थित होते. या प्रकरणी आम्ही सुरुवातीपासूनच या अधिकाऱ्यांसोबत आहोत. तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करणार आहोत. या प्रकरणी आम्ही कतारच्या अधिकाऱ्यांसमोर आवाज उठवणार आहोत. या प्रकरणाची संवेदनशीता विचारात घेता न्यायालयाच्या निर्णयावर कुठल्याही प्रकरणाचं मतप्रदर्शन करणं योग्य ठरणार नाही.

ऑक्टोबर महिन्यामध्ये कतारमधील एका न्यायालयाने भारतीय नौदलामधील ८ माजी सैनिकांना फाशीची शिक्षा सुनावली होती. हे भारतीय माजी नौसैनिक कतारमध्ये राहून इस्राइलसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप कतारच्या प्रशानसाने ठेवला होता. तसेच त्यांना अटक केली होती. या कारवाईमुळे भारताला धक्का बसला होता. त्यानंतर भारत सरकारने या माजी नौसैनिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होती. त्यासाठी कतारच्या प्रशासनासमोर आवाज उठवण्यात आला होता. तसेच न्यायालयात अपीलही करण्यात आलं होतं. अखेर आज या आठ माजी नौसैनिकांसह त्यांचे कुटुंबीय आणि भारत सरकारला मोठा दिलासा देणारा निर्णय कोर्टाने दिला आहे.

मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांची नावे  कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि राजेश.  या सर्व माजी अधिकाऱ्यांनी २० वर्षे भारतीय नौदलात सेवा बजावली होती. नौदलात असताना त्यांचा कार्यकाळ निर्दोष राहिला असून त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

Web Title: Big relief, stay of death sentence awarded to 8 ex-Navy officers, court decision in Qatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.