मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:18 IST2025-12-12T12:18:14+5:302025-12-12T12:18:48+5:30
कॅरिबियन समुद्रात सध्या तणाव शिगेला पोहोचला आहे. एका बाजूला ट्रम्प प्रशासन 'ड्रग तस्करी'चा आरोप करत वेनेझुएलाविरुद्ध लष्करी कारवाईची तयारी करत आहे, तर दुसरीकडे रशियाने मादुरो यांच्या सरकारला थेट समर्थन दिले आहे.

मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
अमेरिका आणि तेल-समृद्ध वेनेझुएला यांच्यातील वाढत्या तणावामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी वेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पाठिंबा दर्शविला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेझुएलावर जमिनीवरून हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर, पुतिन यांनी मादुरो यांच्याशी फोनवर संवाद साधून वेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचे आणि लोकांच्या एकजुटीचे संरक्षण करण्याचे वचन दिले आहे.
कॅरिबियन समुद्रात सध्या तणाव शिगेला पोहोचला आहे. एका बाजूला ट्रम्प प्रशासन 'ड्रग तस्करी'चा आरोप करत वेनेझुएलाविरुद्ध लष्करी कारवाईची तयारी करत आहे, तर दुसरीकडे रशियाने मादुरो यांच्या सरकारला थेट समर्थन दिले आहे. या घडामोडींमुळे जगातील दोन महासत्तांमध्ये संभाव्य संघर्ष निर्माण होण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
अमेरिका का आक्रमक?
वेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठे तेलसाठे आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेचे प्रशासन निकोलस मादुरो यांचे सरकार उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. २०२४ च्या निवडणुकीत मादुरो यांच्या विजयाला अमेरिकेने मान्यता दिलेली नाही.
ट्रम्प यांच्या धमकीनंतर प्यूर्टो रिको येथे अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टर्सची उपस्थिती वाढल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर, मादुरो यांनी आपल्या राष्ट्राच्या संरक्षणाची शपथ घेतली असताना, पुतिन यांचा पाठिंबा रशिया-अमेरिका यांच्यातील 'शीतयुद्धा'ची आठवण करून देणारा आहे.