पॅरिस : सोशल मीडियाच्या विळख्यातून आणि स्क्रीनच्या वाढत्या व्यसनापासून तरुण पिढीला वाचवण्यासाठी फ्रान्स सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नवीन वर्षाच्या संदेशात याबाबत स्पष्ट संकेत दिले असून, मुलांच्या हितासाठी सरकार लवकरच नवीन विधेयक संसदेत मांडणार आहे.
१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी फ्रान्स सरकारचा रात्रीच्या वेळी सोशल मीडियाच्या वापरावर 'डिजिटल कर्फ्यू' लागू करण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भातील मसुदा १९ जानेवारीस संसदेत चर्चेसाठी मांडण्याची शक्यता आहे.
निर्बंधांची गरज का भासली?सोशल मीडियामुळे मुलांमध्ये सायबर बुलिंग, ऑनलाइन ट्रोलिंग व आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच, मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे.
सरकारचे नवे उपाय?मुलांच्या सुरक्षिततेसाठी फ्रान्स सरकार खालील महत्त्वाचे बदल करण्याच्या तयारीत आहे.वयोमर्यादा आणि प्रवेश : १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित केला जाईल.रात्रीचा ‘डिजिटल कर्फ्यू’ : १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी रात्रीच्या वेळी सोशल मीडिया वापरण्यावर ‘डिजिटल कर्फ्यू’ म्हणजेच बंदी घालण्यात येणार आहे.शाळांमध्ये बंदी : लहान मुलांच्या वर्गांमध्ये मोबाइल वापरावर पूर्ण निर्बंध.
जगातील देशांची भूमिकाऑस्ट्रेलिया : १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या यूजर्सचे अकाउंट डिॲक्टिव्हेट करण्याचा नियम येथे लागू झाला आहे.स्पेन, ग्रीस : एक्स व फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी अनिवार्य वय मर्यादा ठरवण्याची तयारी सुरू आहे.इटली, डेन्मार्क : येथे वयाची पडताळणी करणारी यंत्रणा वापरली जात आहे.न्यूझीलंड : ऑस्ट्रेलियासारखाच कायदा आणण्यावर विचार केला जात आहे.इंडोनेशिया : हानिकारक कंटेंट फिल्टर करणे अनिवार्य करण्यावर भर दिला आहे............
ट्रेनमधील सोने चोरी, तपास करणारा पोलिसच निघाला चोर, १.४४ कोटी रुपयांचा ऐवज लुटण्यात सहभागी
पाटणा : बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात रेल्वे प्रवाशाकडून १.४४ कोटींचे सोने लुटले होते. या प्रकरणाची चौकशी करणारा रेल्वे पोलिस अधिकारी चोरीत सहभागी होता, असे आढळून आले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.
गया येथील जीआरपी ठाण्याचे प्रभारी राजेशकुमारसिंह यांना अटक झाली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. कोलकाता येथील सराफाचा कर्मचारी धनंजय शाश्वत हे हावडा-बिकानेर एक्स्प्रेसच्या ३-एसी कोचने प्रवास करत असताना त्यांच्याकडील १ किलोचे सोने लुटण्यात आले, असे शाश्वत यांनी तक्रारीत म्हटले आहे.
फरारी आरोपींचा शोध सुरूसराफाचे हे सोने जयपूरमधील एका व्यापाऱ्याला देण्यात येणार होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटणा रेल्वे पोलिस अधीक्षकांच्या एक विशेष चौकशी पथक तयार करण्यात आले. कॉल डिटेल्स रेकॉर्डचे विश्लेषण केले. त्यातून राजेशकुमारसिंह व अन्य काही लोकांचा या चोरीतील सहभाग उघड झाला. तसेच इतर फरार आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे.गया स्थानकावर पोलिसांच्या गणवेशातील चार जण ट्रेनमध्ये चढले. त्यापैकी दोन जण तक्रारदार धनंजय शाश्वत यांच्या जवळ बसले आणि सोन्याबाबत विचारणा केली.