This is the best time to invest in India: PM Modi | भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वांत चांगली वेळ आहे: पंतप्रधान मोदी
भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वांत चांगली वेळ आहे: पंतप्रधान मोदी

भाजपा सरकारने 2011मध्ये पदभार स्वीकारला तेव्हा भारतीची जीडीपी 2 ट्रिलियन डॅालर्स होती. मात्र आता भारताचे 5 ट्रिलियन डॅालर्सपर्यत पोहचण्याचे लक्ष्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. बँकॉक येथे आयोजित आदित्य बिर्ला समूहाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते.

भारतात राहणीमान, एफडीआय, उत्पादकता, पायाभूत सुविधा वाढत आहेत. तसेच गुंतवणुकीसाठी भारत जगात सर्वांधिक आकर्षक अर्थव्यवस्थेपैकी एक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे  करक्षेत्रात आम्ही महत्वाचे काम केले असून भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वांत चांगली वेळ आहे, असे आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी गुंतवणूकदारांना केले.

दरम्यान पंतप्रधान मोदींनी जम्मू- काश्मीरमधून कलम 370 हटविल्याचा देखील भाषणात उल्लेख केला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचे विभाजन करत भारताने दहशतवाद आणि फुटीरतावादामागील मोठे कारण नष्ट केल्याचे मोदींनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

Web Title: This is the best time to invest in India: PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.