"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:37 IST2025-06-13T17:37:12+5:302025-06-13T17:37:26+5:30

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही नोट ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करण्यापूर्वी वेस्टर्न वॉलवर सोडली होती. तर जाणून घेऊयात काय आहे याचा अर्थ...?

Benjamin Netanyahu left this special note on the Holy Wall before attacking Iran operation rising lion What does it mean | "जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?

इस्रायलनेइराणची राजधानी असलेल्या तेहरानसह अनेक ठिकाणांवर जोरदार हल्ले चढवले आहेत. या हल्ल्याने इराण जबरदस्त हादरला आहे. इस्रायली ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे संपूर्ण इराणमध्ये हाहाकार निर्माण झाला आहे. इस्रायलने इराणच्या लष्करी आणि अण्विक ठिकानांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक 'नोट' व्हायरल होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही नोट ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करण्यापूर्वी वेस्टर्न वॉलवर सोडली होती. तर जाणून घेऊयात काय आहे याचा अर्थ...?

नेतन्याहू यांनी सोडलेले पत्र - 
ऑपरेशन रायझिंग लायन सुरू होण्यापूर्वी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वेस्टर्न वॉलवर एक लेटर सोडले होते. यात लिहिले आहे "एक असे राष्ट्र, जे सिंहिनीप्रमाणे उठते आणि सिंहाप्रमाणे स्वतःला उर उचलते." तर जाणून घेऊयात, काय आहे वेस्टर्न वॉल आणि येथे का ठेवली जाते नोट...?

काय आहे 'वेस्टर्न वॉल?' -
वेस्टर्न वॉलला वेलिंग वॉल किंवा कोटेल असेही म्हटले जाते. हे ज्यूंचे धार्मिक स्थळ आहे. जे जुन्या जेरुसलेममध्ये आहे. धार्मिक दृष्टिने ही भिंत ज्यूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लोक येथे प्रार्थना करत असतात. येथे शतकानुशतके नोट ठेवण्याची अथवा सोडण्याची परंपरा चालू आहे. येथे केलेल्या प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचतात, असा लोकांचा विश्वास आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हल्ल्याच्या एक दिवस आधी येथे नोट सोडली होती.

आण्विक केंद्र अन् लष्करी छावण्यांवर इस्रायलने डागली क्षेपणास्त्रे -
वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, इस्रायलने शुक्रवारी (१३ जून) इराणमधील आण्विक केंद्र आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत अंदाधुंद हल्ले केले. इस्रायलच्या मिसाईल हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान झाले असून, लष्करी अधिकारीही मारले गेले आहेत. इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनमध्ये रिव्होल्युशनरी गार्डसचे प्रमुख म्हणजे इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार झाले आहेत. त्याचबरोबर इराणच्या लष्कराचे काही वरिष्ठ अधिकारीही मारले गेले आहेत. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे दोन अणुशास्त्रज्ञ मारले गेले आहेत

Web Title: Benjamin Netanyahu left this special note on the Holy Wall before attacking Iran operation rising lion What does it mean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.