इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत इराणविरुद्ध लवकरच निर्णायक लष्करी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केलं आहे की, हा लष्करी संघर्ष अनंत काळासाठी नसेल आणि तो अनेक वर्षे खेचण्याची त्यांची कोणतीही योजना नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच दरम्यान मंगळवारी दुपारी २ वाजता व्हाईट हाऊसमध्ये वित्त आणि ऊर्जा सचिवांसोबत महत्त्वाची बैठक घेत आहेत. अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे इराणमध्ये सत्तापालटासाठी परिस्थिती निर्माण करत असल्याचं चित्र दिसत आहे. इराणविरुद्धच्या या लष्करी पावलामुळे सौदीसोबत संभाव्य शांतता प्रस्थापित होण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात असे इस्रायलचं म्हणणं आहे.
आनंदावर युद्धाचं सावट! प्री-वेडिंग शूटसाठी दुबईला गेले अन् अडकले; कुटुंबाची सरकारला विनंती
"मोदीजी-नितीशजी, आम्हाला सुरक्षित भारतात आणा", हल्ल्यातून थोडक्यात वाचला दीपक यांचा जीव
नेतन्याहू यांनी सांगितलं की, इस्रायलला इराणसोबत युद्ध नको आहे. इराणविरुद्ध जी कारवाई केली जात आहे, ती अत्यंत वेगवान आणि निर्णायक असेल, असा त्यांचा विश्वास आहे. तसेच इराणमधील सत्तापालटाची जबाबदारी तिथल्या जनतेचीच आहे असंही त्यांनी नमूद केलं. इराणी जनता स्वतःच्या शासनात बदल घडवून आणण्यास सक्षम होईल अशी परिस्थिती अमेरिका आणि इस्रायल मिळून निर्माण करत आहेत. इस्रायलच्या मते, ही लष्करी कारवाई काही काळ सुरू राहू शकते, परंतु ती दीर्घकालीन प्रक्रिया नसेल.
भाजपा नेत्यासह मध्य प्रदेशमधील १०० नागरिक दुबईत अडकले; मोदींकडे मागितली मदत
"आता गमावण्यासारखं काहीच नाही..."; इराणमधील भीषण हल्ल्यानंतर ढसाढसा रडली अभिनेत्री
इराणविरुद्धच्या लष्करी कारवाईमुळे सौदी आणि इस्रायल यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यास मदत होऊ शकते, असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. या मोठ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मंगळवारी दुपारी २ वाजता वित्त सचिव आणि ऊर्जा सचिवांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेषतः इराणविरुद्धच्या धोरणात्मक, आर्थिक आणि ऊर्जाविषयक निर्णयांच्या संदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.