शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बेनझीर भुट्टो हत्येमागे त्यांच्या पतीचाच हात!, परवेझ मुशर्रफ यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 4:44 AM

माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमागे त्यांचे पती व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसीफ अली झरदारी यांचाच हात होता, असा खळबळजनक आरोप जनरल परवेज मुशर्रफ यांनी केला आहे.

इस्लामाबाद : माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमागे त्यांचे पती व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसीफ अली झरदारी यांचाच हात होता, असा खळबळजनक आरोप जनरल परवेज मुशर्रफ यांनी केला आहे.आजारपणाच्या बहाण्याने दुबईत असलेले मुशर्रफ स्वत: बेनझीर भुट्टो खटल्यातील आरोपी असून, न्यायालयाने तीनच आठवड्यांपूर्वी ‘तेहरीक-ए-पाकिस्तान’च्या पाच संशयितांना पुराव्याअभावी निर्दोष ठरविताना मुशर्रफ यांना ‘फरार’ घोषित केले होते.मुशर्रफ यांनी फेसबुक पेजवर टाकलेल्या व्हिडीओमध्ये हा आरोप केला आहे. बेनझीर हत्येशी झरदारी यांचाच कसा संबंध असू शकतो, याविषयी त्यांनी ‘थीअरी’ मांडली. या हत्येने सर्वांत जास्त लाभ फक्त झरदारी यांचाच झाला. ते त्यानंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तेवर होते. त्यांनी याचा तपास का केला नाही, असा सवालही मुशर्रफ यांनी केला.>हत्येने माझाच तोटाचबेनझीर हत्येशी संबंध जोडणे चुकीचे व अतार्किक असून, त्यांची हत्या करून मला काय मिळणार होते, असा सवाल मुशर्रफ यांनी केला.बैतुल्ला मेहसूद आणि त्याच्या हस्तकांनी बेनझीर यांची हत्या केली. याला सज्जड पुरावे आहेत. पण मेहसूदला सुपारी दिली कोणी? ती मी देणे शक्य नव्हते. बैतुल आणि माझे परस्परांशी हाडवैर होते. माझे सरकार बैतुलचाच काटा काढण्याच्या प्रयत्नात होते, असेही मुशर्रफ यांनी स्पष्ट केले.