‘नासा’च्या यशामागे भारतीय वंशाचे डॉ. जे. बॉब बलराम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 04:42 AM2021-04-21T04:42:57+5:302021-04-21T04:43:05+5:30

मंगळावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टरचे ३० सेकंद उड्डाण

Behind the success of NASA, Indian descent Dr. J. Bob Balram | ‘नासा’च्या यशामागे भारतीय वंशाचे डॉ. जे. बॉब बलराम

‘नासा’च्या यशामागे भारतीय वंशाचे डॉ. जे. बॉब बलराम

Next

ह्यूस्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने १९ एप्रिल रोजी मंगळ ग्रहावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर उडवून इतिहास घडविला. पहिल्यांदाच हे हेलिकॉप्टर किंवा रोटरक्राफ्टला पृथ्वीवरून नियंत्रित केले गेले. या हेलिकॉप्टरच्या मागे भारतीय वंशाचे वैज्ञानिक डॉ. जे. बॉब बलराम यांची बुद्धिमत्ता आहे. 
मूळचे दक्षिण भारतातील बलराम ‘नासा’च्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत काम करतात. बलराम यांनीच इंजिन्यूटी हेलिकॉप्टर बनविले असून, ते या मार्स हेलिकॉप्टर मोहिमेचे मुख्य अभियंताही आहेत.
बलराम यांना विचारले गेले की, “मंगळ ग्रहावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर फक्त ३० सेकंदांसाठीच का उडाले? ३० सेकंदांचे उड्डाण घेतल्यानंतर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर परत मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले.” यावर बलराम यांनी सांगितले की, “मंगळाच्या वायुमंडळात कोणतीही वस्तू उतरवणे आणि उडवणे फार कठीण आहे. कारण तेथील वायुमंडळ पृथ्वीवर आहे तसे जड नाही. खूपच हलके आहे. या ३० सेकंदांच्या उड्डाणासाठी माझा ३५ वर्षांचा अनुभव आणि जगातील अनेक देशांतील वैज्ञानिकांची ऊर्जा कामी आली आहे.”

n    बलराम म्हणाले की, “ नासाकडून मंगळ ग्रहावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर उडवणे हे राइट ब्रदर्स यांच्या विमानाच्या पहिल्या उड्डाणासारखेच होते.”
n    बलराम सध्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीत काम करतात. ते म्हणाले, राइट बंधूंनी विमान तर फक्त १२ सेकंद उडवले होते. विमानाने पहिल्या उड्डाणात फक्त १२० फूट उंची गाठली होती. जे ३० सेकंद इंजिन्यूटी मंगळाच्या पृष्ठभागावर उडत होते तेव्हा श्वास थांबला असे वाटले.
n    बॉब नासाच्या जेपीएलमध्ये ३५ वर्षांपासून रोबोटिक्स टेक्नोलॉजिस्ट आहेत. त्यांनी जे. कृष्णमूर्ती यांनी स्थापन केलेल्या ऋषी व्हॅली शाळेत शिक्षण घेतले. नंतर त्यांनी आयआयटीतून (मद्रास) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. न्यूयॉर्कच्या रेनसिलर पॉलिटेक्निक इन्सिट्यूटमधून काॅम्प्युटर अँड सिस्टम इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळविली. 

Web Title: Behind the success of NASA, Indian descent Dr. J. Bob Balram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :NASAनासा