पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 10:35 IST2025-12-04T10:32:54+5:302025-12-04T10:35:09+5:30
पुतिन आज दुपारी ४:३० च्या सुमारास भारतात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी एक खाजगी जेवणाचे आयोजन करणार आहेत. गेल्या जुलैमध्ये, पुतिन यांनी रशिया भेटीदरम्यान मोदींना असाच आदरातिथ्य दाखवला होता.

पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज गुरुवारी (०४ जुलै ) रोजी नवी दिल्लीत येणार आहेत, ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारताने पुतिन यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे, यामध्ये खाजगी जेवण, राज्य मेजवानी, उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा आणि सीईओंना संबोधित करणे यांचा समावेश आहे. दरम्यान, युरोपीय देश भारताला युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियावर दबाव आणण्याचा आग्रह करत आहेत. अमेरिका आणि युरोप भारतावर रशियन तेल खरेदी कमी करण्यासाठी सतत दबाव आणत आहेत, कारण यामुळे पुतिन यांच्या "युद्ध यंत्राला" निधी मिळतो. तर दुसरीकडे आज जगाचे लक्ष मोदी आणि पुतिन यांच्या भेटीवर आहे.
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
२०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून, मोदी आणि पुतिन यांनी १६ वेळा संवाद साधला आहे. २०२२ ते २०२४ दरम्यान ११ वेळा आणि २०२५ मध्ये फक्त पाच वेळा. सप्टेंबर २०२२ मध्ये उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी प्रथम पुतिन यांना सांगितले, "आज युद्धाचा काळ नाही." जुलै २०२४ मध्ये मॉस्को भेटीदरम्यान, मोदींनी पुनरुच्चार केला, "युद्धभूमीवर उपाय सापडत नाहीत."
मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान पुतिन यांनाही पीएम मोदी असाच संदेश देणार आहेत. पण, युक्रेन, रशिया, युरोप आणि अमेरिका या चारही पक्षांनी वाटाघाटीच्या टेबलावर एकत्र येऊन तोडगा काढणे शक्य आहे. भारताने यापूर्वी शांतता प्रयत्नांमध्ये भूमिका बजावली आहे - झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेबाबत रशियाशी वाटाघाटी करणे आणि रशिया-युक्रेन धान्य करारात "शांतपणे" मदत करणे.
युरोपने भारताला केले आवाहन
काही दिवसापूर्वी ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्सच्या राजदूतांनी रशियावर टीका केली. पोलंडचे परराष्ट्र सचिव व्लादिस्लाव तेओफिल बार्टोस्झेव्स्की म्हणाले, "मला आशा आहे की पंतप्रधान मोदी पुतिन यांना शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास सांगतील. हे युद्ध सुरू राहणे तुमच्या, आमच्या किंवा जगाच्या हिताचे नाही. पुतिन पंतप्रधान मोदींचे ऐकतात, असंही ते म्हणाले.