सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 17:17 IST2025-05-19T17:16:32+5:302025-05-19T17:17:48+5:30

आतापर्यंत पाकिस्तानात १५ हून अधिक दहशतवादी अज्ञात हल्ल्यात ठार झालेत. त्यातील बहुतांश दहशतवादी भारतातील हल्ल्यात सहभागी होते.

Before Saifullah Khalid murder in pakistan more than 15 brutal terrorists have been killed by the 'secret killer' | सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

नवी दिल्ली - पाकिस्तानातील सिंध प्रांतात रविवारी लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह खालिदला अज्ञात हल्लेखोराने ठार केले. दहशतवादी खालिद दीर्घकाळापासून नेपाळमधून टेरर एक्टिविटी ऑपरेट करत होता. परंतु हत्येच्या वेळी तो सिंध प्रांतात रजाउल्लाह नावाने लपून राहिला होता. भारतात झालेल्या ३ मोठ्या हल्ल्यात खालिदचा समावेश होता. 

लश्कराने खालिदला भारतात हल्ल्याची तयारी करण्याचा टास्क दिला होता. त्यानंतर तो नेपाळमध्ये अनेक वर्ष बेस बनवून तिथून भारतात हल्ल्याची तयारी करत होता. परंतु जेव्हा भारताच्या गुप्तचर यंत्रणेला याची माहिती मिळाली तेव्हा तो नेपाळमधून पळून पाकिस्तानात जाऊन लपला. खालिद भारताचा पहिला मोस्ट वॉटेंड दहशतवादी नाही ज्याला पाकिस्तानात सीक्रेट किलरने मारले आहे. याआधीही भारताचे अनेक शत्रू आणि कट्टर दहशतवाद्यांना याच पॅटर्नने ठार करण्यात आले आहे.

माहितीनुसार, आतापर्यंत पाकिस्तानात १५ हून अधिक दहशतवादी अज्ञात हल्ल्यात ठार झालेत. त्यातील बहुतांश दहशतवादी भारतातील हल्ल्यात सहभागी होते. हे दहशतवादी लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेत सहभागी होते. त्यातील एक मोठे नाव अबू कताल जो लश्करात टॉप टेररिस्ट होता. जम्मू काश्मीरातील अनेक हल्ल्यात त्याचा सहभाग होता. याचवर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानात झेलम परिसरात त्याला अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले. NIA च्या यादीत तो मॉस्ट वॉटेंड दहशतवादी होता. 

याचप्रकारे शाहिद लतीफ आणि अदनान अहमदही मारले गेले. हाफिज सईजचा हा अत्यंत जवळचा आणि लश्करातील टॉप कमांडर होता. डिसेंबर २०२३ मध्ये कराचीत अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. हाफीज सईदचा जवळचा व्यक्ती पॉलिटिकल विंगचा नेता मौलाना काशिफ अली हादेखील हल्ल्यात मारला गेला. फेब्रुवारी २०२५ मध्ये पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वात त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मुफ्ती शाह मीर यालाही मार्च २०२५ मध्ये बलूचिस्तान येथील तुरबत शहरात अज्ञातांनी गोळी झाडून ठार केले. मुफ्ती शाह मीर याच्यावर कुलभूषण जाधव यांचे ईराणमधून अपहरण करण्यात मदत केल्याचा आरोप होता. रहिमुल्ला तारीक, अकरम गाजी, ख्वाजा शहीद, मौलाना जियाउर रहमान, बशीर अहमद, जहूर इब्राहिम, मेजर दानियाल, परमजित सिंह पंजवर, कारी एजाज आबिद, दाऊद मलिक यासारखे अनेक दहशतवादी पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात ठार झाले.  

Web Title: Before Saifullah Khalid murder in pakistan more than 15 brutal terrorists have been killed by the 'secret killer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.