युक्रेन युद्धात 'मधमाशांचे पोळे'बनले नवे शस्त्र! कीव सैन्याने रशियाच्या सैन्यावर फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:53 IST2025-03-06T11:50:18+5:302025-03-06T11:53:28+5:30
रशिया-युक्रेन युद्धाचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

युक्रेन युद्धात 'मधमाशांचे पोळे'बनले नवे शस्त्र! कीव सैन्याने रशियाच्या सैन्यावर फेकले
रशिया-युक्रेनमध्ये गेल्या काही वर्षापासून युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूंच्या सैन्याने विविध प्रकारची शस्त्रे वापरली आहेत. दरम्यान, आता युक्रेनियन सैनिकांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये, युक्रेनियन सैनिक जेव्हा त्यांचा दारूगोळा संपतो तेव्हा एक नवीन रणनीती स्वीकारतात आणि जवळच्या मधमाश्यांच्या पोळ्याचा शस्त्र म्हणून वापर करत असल्याचे दिसत आहे.
POK वर मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान; पाकिस्तानी पत्रकाराची बोलतीच बंद, म्हणाले...
एका टेलिग्राम चॅनेलनुसार, हा व्हिडीओ पोक्रिव्हस्क शहरातील ग्रामीण भागातील आहे. ड्रोनद्वारे बनवलेल्या या व्हिडिओमध्ये रशियन सैनिक तळघरात लपलेले स्पष्टपणे दिसत आहे. युक्रेनियन सैनिक तिथे पोहोचतात. तो मधमाश्यांच्या पोळ्या तपासतो आणि नंतर त्या उचलतो आणि तळघरात पळत असल्याचे दिसत आहे. यानंतर, तो एका छिद्रातून पोळे तळघरात फेकतो आणि तिथून पळून जातो. व्हिडिओमध्ये रशियन सैनिक तेथून निघताना दिसत नाहीत.
युक्रेनियन सैन्याकडे दारूगोळा संपला?
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, युक्रेनियन सैन्याकडे दारूगोळा संपला तेव्हा त्यांनी मधमाश्यांचा वापर सुरू केला. या युद्धात कीटकांचा वापर पहिल्यांदाच झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रशिया-युक्रेन युद्ध गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला मदत करण्यास नकार दिला आहे. पाश्चात्य देशांकडून वेळेवर शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत नसल्याने, युक्रेन हलक्या ड्रोनच्या मदतीने रशियन सैन्य आणि लष्करी प्रतिष्ठानांवर हल्ला करत आहे. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे नसतानाही, युक्रेन आपल्या वेगवान ड्रोनच्या मदतीने रशियाचे मोठे नुकसान करत आहे.