बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:49 IST2025-11-15T07:48:54+5:302025-11-15T07:49:10+5:30
Donald Trump News: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याबद्दल दिशाभूल करणारे संपादन केल्याबद्दल बीबीसीने माफी मागितली आहे.

बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
लंडन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याबद्दल दिशाभूल करणारे संपादन केल्याबद्दल बीबीसीने माफी मागितली आहे. मात्र, आम्ही ट्रम्प यांची कोणतीही बदनामी केली नसल्याचा दावा करत मानहानीचा खटला दाखल करणाला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा दावा बीबीसीने केला आहे. या वादामुळे बीबीसीच्या व्यवस्थापनात मोठे बदल घडले आहेत. यासंदर्भात बीबीसीचे अध्यक्ष समीर शाह यांनी व्हाइट हाउसला एक वैयक्तिक पत्र पाठवले आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी ट्रम्प यांनी केलेल्या भाषणानंतर काही समर्थकांनी संसदेवर हल्ला केला होता. त्यावेळी ट्रम्प यांच्या भाषणाबद्दल आमच्याकडून अनावधानाने दिशाभूल करणारे संपादन झाल्याची कबुली देत खेद व्यक्त केला.