एकेकाळच्या मुंबई प्रांतातील बेटासाठी येमेन-युएईची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 03:14 PM2018-05-17T15:14:16+5:302018-05-17T16:55:31+5:30

मुंबई प्रांताचे गव्हर्नर या बेटाचे कामकाज पाहात असत. आता सगळ्या जगाचा या बेटावर डोळा आहे.

Battle of Yemen-UAE for the island of erstwhile Mumbai province | एकेकाळच्या मुंबई प्रांतातील बेटासाठी येमेन-युएईची लढाई

एकेकाळच्या मुंबई प्रांतातील बेटासाठी येमेन-युएईची लढाई

googlenewsNext

सना- यादवी युद्धामुळे गेली अनेक वर्षे अस्वस्थता असलेल्या येमेन आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यामध्ये काही दिवस लढाई सुरु आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या सैन्याने येमेनचा ताबा असणाऱ्या सोकोत्रा बेटावर ताबा मिळवल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव वाढीस लागला होता. सोकोत्रा हे बेट एकेकाळी मुंबई प्रांतामध्ये होते. ब्रिटिशांची सत्ता एडनसह इतर अनेक ठिकाणी होती. अरबी समुद्रामध्ये एडन आणि सोकोत्रा यांना विशेष स्थान होते. सोकोत्रा आणि काही इतर बेटांचा समूह येमेनच्या जवळच आहे. सोकोत्रावर आढळणाऱ्या विशिष्ट झाडांमुळे ते बेट जगप्रसिद्ध आहे. ही झाडे इतरत्र कोठेही आढळत नाहीत. हे बेट अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असल्यामुळे जगातील अनेक देशांचे या बेटावर लक्ष असते.

संयुक्त अरब अमिरातीने सोकोत्रावर पाय ठेवले असले तरी येमेनचे पंतप्रधान अहमद बिन दागर यांनी लढाई संपल्याचे घोषित केले आहे. सोकोत्रा या बेटाला युनेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जाही दिला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील सोकोत्रावर संयुक्त अरब अमिरातीने 300 सैनिकांना पाठवले तसेच रणगाडेही बेटावर पाठवलेय मात्र सोकोत्राच्या रहिवाश्यांनी याला तीव्र विरोध केला. सोकोत्राचे गव्हर्नर हाशिम साद अल- साकात्री यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या या निर्णयाचा निषेध केला आणि हा हल्ला म्हणजे येमेनच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला आहे असे त्यांनी मत व्यक्त केले. इतके दिवस येमेन युद्धामध्ये सोकोत्रा दूर असल्यामुळे ओढले गेले नव्हते मात्र युएईच्या हल्ल्यामुळे सोकोत्रालाही फरफटत नेण्यात आले. 

युएईने सी-17 विमानांच्या मदतीने 2 बीएमपी-3 रणगाडे, शस्त्रास्त्रे असणारी वाहने आणि 100 फौजा तेथे उतरवल्या, दोन वर्षांपुर्वीत सोकोत्रावर लष्करी तळही उभारण्यात आला होता. या सर्व कृतीचे युएईचे  परराष्ट्रमंत्री अन्वर गर्गश यांनी केले होते, आमचे सोकोत्राच्या नागरिकांशी ऐतिहासिक व कौटुंबिक संबंध आहेत असे विधान करुन हे संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित करत आहोत असे युएईच्या कृतीचे समर्थन त्यांनी केले होते.

Web Title: Battle of Yemen-UAE for the island of erstwhile Mumbai province

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.