शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

मुक्या जनावरांना मदत करणारा बॅटमॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 2:24 AM

लहानपणीच चित्रपटांमधून मिळाली होती प्रेरणा...

अनेक सिनेमांमध्ये तुम्ही सुपरहिरोंना गरीब लोकांची मदत करताना पाहिलं असेल. पण ख-या आयुष्यातही एक असाच सुपरहिरो आहे.फ्लोरिडाचा २७ वर्षीय क्रिस वॅन मुक्या जनावरांसाठी सुपरहिरोपेक्षा कमी नाही. क्रिस नेहमीच बॅटमॅनच्या पोशाखात दिसतो आणि जनावरांना मदत करण्यासोबतच त्यांना घरीही पोहोचवत आहे. दुसऱ्यांनी सुद्धा असं करावं म्हणून त्याने हा पोशाख निवडला आहे. जेणेकरून तो वेगळा दिसावा आणि जगातील लोकांपर्यंत संदेश पोहोचावा.

क्रिसने याची सुरूवात जनावरांची मदत करणाऱ्या एका संस्थेतून वॉलेंटिअर म्हणून केली होती. २०१८ मध्ये क्रिसने जनावरांच्या मदतीसाठी बॅटमॅन फॉर पॉज या संस्थेची सुरूवात केली. या माध्यमातून त्याने अनेक जनावरांचा जीव वाचवला आणि त्यांचं घर शोधून त्यांना घरी पोहोचवलं. जर त्या जनावरांची घरे नसतील किंवा कुणी मालक नसेल तर ही जनावरे दुस-या लोकांना सोपवली जातात.

जनावरांना आणणे आणि घेऊन जाणे यासाठी क्रिस त्याच्या होंडा अकॉर्डचा वापर करतो. पण त्याला एका अशा व्यक्तीचा शोध आहे, जी या कामासाठी एखादी मोठी गाडी दान करू शकेल. क्रिसनुसार, बालपणी मी जेव्हा सुपरहिरो सिनेमे बघायचो तेव्हा मलाही लोकांच्या मदतीसाठी त्यांच्यासारखं होण्याची इच्छा व्हायची. त्यामुळे मी हा मार्ग निवडला.

कधी करतो काम?बॅटमॅनकडे ई-मेल, फोन आणि सोशल मीडियाच्या मदतीने जनावरांना वाचवण्याची रिक्वेस्ट येतात. त्यामुळे क्रिस जनावरांच्या मालकांना शोधण्याचं काम वीकेंडलाही करतो. तर जनावरांना एका ठिकाणाहून दुस?्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम सोमवार, मंगळवार आणि बुधवारी या दिवसात करतो.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचार