बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:59 IST2025-07-28T11:56:41+5:302025-07-28T11:59:34+5:30
बांगलादेशचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी ढाका विमान अपघातातील बळींवर उपचार केल्याबद्दल भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर भारतासोबतचे संबंध बिघडले होते. मोहम्मद युनूस यांनी अनेकवेळा भारताविरोधात वक्तव्य केली होती. दरम्यान, काल अचानक मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले आहेत. बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी भारतीय डॉक्टर आणि परिचारिकांचे विशेष आभार मानले आहेत. मोहम्मद युनूस यांनी ढाका येथे नुकत्याच झालेल्या विमान अपघातातील पीडितांवर उपचार केल्याबद्दल भारतीय डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
भारताव्यतिरिक्त त्यांनी चीन आणि सिंगापूरच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही आभार मानले आहेत. मोहम्मद युनूस यांनी एक निवेदन जारी केले. 'जखमींची मनापासून सेवा केली आहे. खरंतर, गेल्या आठवड्यात ढाका येथे एक विमान अपघात झाला होता, यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला होता.
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
मोहम्मद युनूस यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली
काही दिवसापूर्वी बांगलादेशचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांनी रविवारी सिंगापूर, चीन आणि भारतातील २१ डॉक्टर आणि परिचारिकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.
यादरम्यान, मोहम्मद युनूस यांनी आरोग्य व्यावसायिकांनी दिलेल्या जलद सेवा आणि प्रतिसाद आणि मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यासोबतच, मोहम्मद युनूस यांनी या राष्ट्रीय संकटादरम्यान बांगलादेशमधील समर्पणाबद्दल त्यांच्या एकतेचे कौतुक केले. हे संघ फक्त त्यांच्या कौशल्यानेच नव्हे तर मनापासूनही आले आहेत.
अनेक देशांतील टीम बांगलादेशमध्ये आली होती. त्यांनी रुग्णांवर उपचार केले. ढाका येथे झालेल्या विमान अपघातात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथक स्थानिक आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सहकार्याने जखमींवर उपचार सुरू आहेत.
या बैठकीत मोहम्मद युनूस यांनी डॉक्टरांना बांगलादेशशी संस्थात्मक सहकार्य, वैद्यकीय शिक्षण देवाणघेवाण आणि आरोग्यसेवा क्षेत्रात क्षमता बांधणी आणि नवोपक्रमात सतत सहभागासाठी दीर्घकालीन संबंध राखण्याचे आवाहन केले.