कट्टरतेचा कळस...! बांगलादेशात आणखी एका ISKCON मंदिरावर हल्ला; कट्टरतावाद्यांनी तोडफोडीनंतर लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:45 IST2024-12-07T17:42:34+5:302024-12-07T17:45:38+5:30
कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनीही या घटनेची पुष्टी केली असून म्हटले आहे की, "मंदिराचे टिनचे छत काढण्यात आले आणि पेट्रोलचा वापर करून आग लावण्यात आली."

प्रतिकात्मक फोटो
बांगलादेशात अल्पसंख्यक हिंदू आणि हिंदूंच्यामंदिरांवरील हल्ले सातत्याने वाढताना दिसत आहेत. शुक्रवारी रात्री (6 डिसेंबर 2024) ढाक्यातील आणखी एका हिंदू मंदिरावर कट्टरवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. स्थानीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कट्टरवाद्यांनी इस्कॉन नमहट्टा मंदिरावर हा हल्लाकेला.
माध्यमांतील वृत्तांनुसार, "सर्वप्रथम मंदिरात तोडफोड करण्यात आली. यानंतर, जमावाने देवांच्या मूर्तींना आग लावली. या मंदिराचे व्यवस्थापन इस्कॉन करत होते. याहल्ल्यानंतर, पुन्हा एका हिंदू संघटनांनी आरोप केला आहे की, कट्टरवाद्यांकडून अल्पसंख्यक हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत आणि मुहम्मद युनूस केवळ मूकदर्शक बनले आहेत.
कोलकाता इस्कॉनच्या उपाध्यक्षांनी केली पुष्टी
कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यानी म्हटले आहे, "मंदिराचे टिनचे छत काढण्यात आले आणि पेट्रोलचा वापर करून आग लावण्यात आली. आठवडाभरापूर्वी, मुस्लीम जमावाने इस्कॉन नमहट्टा केंद्र जबरदस्तीने बंद केले होते. चिन्मय कृष्ण दास प्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नुकतीच झालेली अटक, इस्कॉन या हिंदू संघटनेवर बंदी घालण्याचा प्रयत्न आणि देशद्रोहाच्या खटल्यांद्वारे हिंदूंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदूंवरील अत्याचार सुरूच आहेत."
Another ISKCON Namhatta Centre burned down in Bangladesh. The Deities of Sri Sri Laxmi Narayan and all items inside the temple, were burned down completely 😭. The center is located in Dhaka. Early morning today, between 2-3 AM, miscreants set fire to the Shri Shri Radha Krishna… pic.twitter.com/kDPilLBWHK
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) December 7, 2024
चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर हल्ल्यांचे प्रमाण वाढले -
खरे तर, शेख हसीना यांची सत्ता गेल्यापासून हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटना वाढल्या होत्या. मात्र, 'सम्मिलिता सनातनी जागरण जोत'शी संबंधित चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली 25 नोव्हेंबरला ढाका येथे अटक केल्यानंतर, यात आणखी वाढ झाली आहे. कट्टरतावादी सातत्याने हिंदू मंदिरांना लक्ष्य करत आहेत. हिंदू समुदायाच्या रॅलीमध्ये चिन्मय दास आणि इतरांवर एका स्थानिक राजकारण्याने, बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांना अटक करण्या आली.