शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

बांग्लादेशात परिस्थिती चिघळली; स्वतःच्या सुरक्षेची मागणी करत पोलिसांनीच पुकारला संप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 21:23 IST

बांग्लादेशातील हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, यातील बहुतांश पोलीस कर्मचारी आहेत.

Bangladesh Sheikh Hasina : बांग्लादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलिसांनी संप पुकारला आहे. सुरक्षेच्या मागणीसाठी बांगलादेशातील पोलीस संपावर गेले आहेत. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आतापर्यंत 400 पोलिस ठाण्यांवर हल्ले झाले आहेत, ज्यामध्ये अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशाची पोलिस संघटना 'बांग्लादेश पोलिस सर्व्हिस असोसिएशन'ने म्हटले की, जोपर्यंत प्रत्येक पोलिसाची सुरक्षा सुनिश्चित केली जात नाही, तोपर्यंत पोलिस कर्मचारी संपावरच राहणार आहे. संघटनेने आपल्या निवेदनात निष्पाप विद्यार्थ्यांवर्यू केलेल्या कारवाईबद्दल माफीही मागितली आहे.

शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; आधी युकेने नकार दिला, आता अमेरिकेने व्हिसा रद्द केला...

अमित शाहंनी बोलावली बैठक बांग्लादेशातील सतत बिघडत चाललेल्या परिस्थितीवर गृहमंत्री अमित शाह यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली. संसद भवनात झालेल्या या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोवाल आणि गृह सचिव यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बांग्लादेशातील परिस्थिती आणि सीमा सुरक्षा यावर चर्चा झाली. दरम्यान, भारत बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांच्या संपर्कात असून, तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.

दोन महिन्यांपूर्वी शेख हसीना यांनी व्यक्त केलेली भीती होतेय खरी, होणार नव्या देशाचा जन्म? 

भारत-बांग्लादेश सीमा सीलबांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सतर्क आहे. बीएसएफने सोमवारीच 4,096 किमी लांबीच्या भारत-बांग्लादेश सीमेवरील सर्व युनिट्ससाठी हाय अलर्ट जारी केला असून, संपूर्ण सीमा सील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बांग्लादेशची सर्वाधिक 2200 किमी लांबीची सीमा पश्चिम बंगालशी लागून आहे आणि हाच भाग अत्यंत संवेदनशील आहे. ताज्या घडामोडी लक्षात घेऊन बीएसएफचे कार्यवाहक महासंचालक (डीजी) दलजित सिंग चौधरी यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी भारत-बांग्लादेश सीमेचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

बांग्लादेशातील आंदोलनाची आग अमेरिकेपर्यंत पोहोचली; आंदोलक बांग्लादेशी दूतावासात घुसले...

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केलीमंगळवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांग्लादेशातील परिस्थितीवर राज्यसभेत निवेदन दिले आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. बांग्लादेशात लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि तेथील अल्पसंख्याक समुदाय हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे, असे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय, केंद्र सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी संसदेत दिली. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशPoliceपोलिसInternationalआंतरराष्ट्रीय