नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार बालेन शाह; शपथविधीच्या काही तास आधीच झाले व्हायरल! कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 09:31 IST2026-03-27T09:29:22+5:302026-03-27T09:31:30+5:30

'राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी'चे नेते बालेन शाह आज नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.

Balen Shah to be sworn in as Nepal's Prime Minister; Goes viral hours before swearing-in ceremony! Why? | नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार बालेन शाह; शपथविधीच्या काही तास आधीच झाले व्हायरल! कारण काय? 

नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार बालेन शाह; शपथविधीच्या काही तास आधीच झाले व्हायरल! कारण काय? 

नेपाळच्या राजकारणात आज एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी एक रॅपर आता देशाची धुरा सांभाळणार आहे. 'राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी'चे नेते बालेन शाह आज नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, या ऐतिहासिक शपथेपूर्वीच बालेन शाह यांच्या एका गाण्याने इंटरनेटवर अक्षरशः आग लावली आहे. 'जय महाकाली' या त्यांच्या रॅप गाण्याला अवघ्या दोन तासांत लाखो व्ह्यूज मिळाले असून, नेपाळमध्ये सध्या बालेन लाट पाहायला मिळत आहे.

प्रचंड बहुमताने सत्तेत एन्ट्री

५ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत बालेन शाह यांच्या पक्षाने ऐतिहासिक कामगिरी केली. एकूण २७५ जागांपैकी तब्बल १८२ जागा जिंकत त्यांनी नेपाळच्या राजकारणातील जुन्या प्रस्थापितांना धूळ चारली. मधेश भागातून देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदावर पोहोचणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. गुरुवारी त्यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आणि आज, २७ मार्च रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे.

'जय महाकाली'ने वाढवली धडधड

शपथ घेण्यापूर्वी बालेन शाह यांनी एका रॅप गाण्याच्या माध्यमातून देशवासीयांना संदेश दिला आहे. हे गाणे मूळतः १० वर्षांपूर्वीचे असले, तरी नव्या जोशात आणि निवडणूक प्रचाराच्या दृश्यांसह पुन्हा रिलीज करण्यात आले. "एकतेची शक्ती हीच माझी राष्ट्रीय शक्ती आहे," असे आवाहन त्यांनी या गाण्यातून केले आहे. गुरुवारी हे गाणे रिलीज होताच अवघ्या २ तासांत १.५ लाख लोकांनी ते पाहिले, तर शुक्रवारी सकाळपर्यंत हा आकडा २० लाखांच्या पार गेला आहे.

तरुणांच्या उठावातून जन्मलेले नेतृत्व

सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळमध्ये तरुणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका मोठ्या उठावानंतर पहिल्यांदाच या निवडणुका पार पडल्या. बालेन शाह हे या बदललेल्या नेपाळचा चेहरा मानले जातात. "माझे हृदय हिमतीने भरलेले आहे, माझे रक्त सळसळत आहे... मी चित्त्यासारखा धावेन," अशा आशयाचे बोल असलेल्या त्यांच्या गाण्याने नेपाळी तरुणांमध्ये चैतन्य भरले आहे.

Web Title : रैपर बालेन शाह बनेंगे नेपाल के पीएम; शपथ से पहले गाना वायरल!

Web Summary : 35 वर्षीय रैपर बालेन शाह नेपाल के सबसे युवा पीएम बने। शपथ से पहले उनका गाना 'जय महाकाली' वायरल हो गया, जिसे ऐतिहासिक चुनावी जीत के बाद युवा समर्थन मिला। शाह का नेतृत्व नेपाल के लिए एक नए युग का प्रतीक है।

Web Title : Rapper Balen Shah to be Nepal's PM; Song Goes Viral!

Web Summary : Rapper Balen Shah, 35, becomes Nepal's youngest PM. His song 'Jai Mahakali' went viral before his swearing-in, fueled by youth support after a historic election victory. Shah's leadership embodies a new era for Nepal.