'बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही', मुस्लिमबहुल देशाने घेतला मोठा निर्णय; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:05 IST2025-06-03T13:05:02+5:302025-06-03T13:05:38+5:30

Bakrid Eid : बरकी ईदच्या दिवशी प्राण्याची कुर्बानी न देण्याचे आदेशच देशाच्या प्रमुखाने दिले आहेत.

Bakrid-Eid-morocco-king-mohammed-vi-bans-qurbani-on-bakri-eid | 'बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही', मुस्लिमबहुल देशाने घेतला मोठा निर्णय; कारण काय?

'बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही', मुस्लिमबहुल देशाने घेतला मोठा निर्णय; कारण काय?


Bakrid Eid : या महिन्याच्या 6-7 तारखेला ईद-उल-अजहा, म्हणजेच बकरी ईद साजरी केली जाईल. या दिवशी इस्लामचे अनुयायी बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देतात. पण, आता या कुर्बानीबाबत एका मुस्लिम देशाने मोठा निर्णय घेतला आहे. 99 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इस्लामिक देश मोरोक्कोने ईदच्या दिवशी बकरी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी न देण्याचे आदेश जारी केले आहेत. 

मोरोक्कोचे राजा मोहम्मद-VI यांच्या शाही फर्मानानंतर सुरक्षा दल देशभरात विविध ठिकाणी छापे टाकून बकऱ्या शोधण्याचे काम करत आहे. ज्यांच्याकडे बकरी सापडेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल. इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याला खूप महत्त्व आहे. पण, आता थेट राजाने आदेश दिल्यामुळे देशातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. 

कुर्बानीवर बंदी का घातली?
देशात पसरलेल्या तीव्र दुष्काळामुळे प्राण्यांची संख्या कमी होत असल्याने मोहम्मद यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या आठवड्यात येणारा बकरी ईदचा सण लोकांनी प्रार्थना आणि दान करून साजरा करावा आणि कुर्बानी टाळावी असे आवाहन राजाने केले आहे. राजाच्या या निर्णयानंतर अधिकाऱ्यांनी जनावरांच्या विक्रीवर बंदी घातली असून, कुर्बानीसाठी गुप्तपणे आणलेल्या बकऱ्या घरातून जप्त करण्यात येत आहेत. 

या निर्णयाबद्दल मुस्लिम देशांचे काय मत?
मोरक्को सरकारने घेतलेल्या या निर्णयावर इतर मुस्लिम देशाने आक्षेप घेतला आहे. सरकार धार्मिक रीतिरिवाजांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप इतर मुस्लिम देश करत आहेत. पण, काही लोक सरकारच्या निर्णयाशी सहमतही आहेत. 

Web Title: Bakrid-Eid-morocco-king-mohammed-vi-bans-qurbani-on-bakri-eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.