बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:46 IST2025-08-05T12:21:30+5:302025-08-05T12:46:03+5:30

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची भाकिते ही अनेकदा अस्पष्ट असतात. त्यामुळे गोंधळ वाढतो. परंतू एखादी घटना घडली की त्याचा अर्थ समजू लागतो.

Baba Vanga's double fire prediction for August 2025; Tired of making good predictions... | बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...

बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...

बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी २०२५ साठी एक भयावह भविष्यवाणी केली आहे. या डबल फायरच्या भविष्यवाणीमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. ऑगस्ट महिना सुरु झाला आहे, रशियाच्या सुमद्रात एका मागोमाग एक मोठे भूकंप होत आहेत. अशातच आता वेंगानुसार ऑगस्टमध्ये हे डबल फायरचे कोणते संकट वाढून ठेवले आहे, याचा अंदाज लावला जात आहे. 

बाबा वेंगाची भाकिते ही अनेकदा अस्पष्ट असतात. त्यामुळे गोंधळ वाढतो. परंतू एखादी घटना घडली की त्याचा अर्थ समजू लागतो. आता वेंगाच्या भाकितानुसार हे डबल फायर काय आहे याचा अर्थ लावला जात आहे. स्वर्ग आणि पृथ्वीवरून एकाचवेळी दुहेरी आगीचे लोळ उठतील असे वेंगाने म्हटलेले आहे. यामुळे पृथ्वीवरून ज्वालामुखी आणि आकाशातून सौरवादळ उठण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

पृथ्वीच्या पोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. रशियात समुद्राखाली जोरदार भूकंप येत आहेत. यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक किंवा जंगलाची आग या भाकीतात असू शकते. तर सूर्याच्या ज्वाळा यांचा संबंध 'स्वर्गातील आग'शी जोडला जात आहे. २०२५ मध्ये अमेरिका, कॅनडा आणि युरोपच्या जंगलांमध्ये आधीच भीषण आग लागलेली आहे. अंतराळ संस्थांनी उल्कापिंडांबद्दल अनेक दावे केले आहेत.  बरेच लोक ते प्रतीकात्मक देखील मानत आहेत. त्यांच्या मते, 'स्वर्गातील आग' ही दैवी संदेशाचे प्रतीक असू शकते, तर 'पृथ्वीची आग' ही युद्ध, पर्यावरणीय नुकसान आणि नैतिक अध:पतन यासारख्या मानवी चुका प्रतिबिंबित करते. 

2025 बाबत आणखी एक भविष्यवाणी...

"जो हात एक झाला आहे तो दोन तुकडे होईल आणि प्रत्येक हात आपापल्या मार्गाने जाईल." असेही बाबा वेंगाने म्हटले आहे. नाटो किंवा युरोपियन युनियनसारख्या संघटनांमधील राजकीय तणावाचे लक्षण वाटतो, ज्यामुळे काही सदस्य फुटू शकतात किंवा माघार घेऊ शकतात, असे काहींना वाटत आहे. एलियनशी संपर्क होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: Baba Vanga's double fire prediction for August 2025; Tired of making good predictions...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग