ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 16:16 IST2024-10-07T16:15:47+5:302024-10-07T16:16:38+5:30
Baba Vanga Predictions For 2025 : जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वी २०२५ बाबत मोठी भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीनुसार २०२५ मध्ये जगाच्या विनाशाची सुरुवात होणार आहे. तसेच हळूहळू मानवजातीचा अंत होईल

ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
भविष्यवाणी, जगाचा अंत, महायुद्ध याबाबत मानवाच्या मनात नेहमीच कुतुहल राहिलेलं आहे. या भूतलावर असे अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले, ज्यांनी केलेल्या भविष्यवण्या ह्या कालौघात खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या भविष्यवाण्यांबाबत जाणून घेण्यासाठी जगात अधिकच उत्सुकता दिसून येते. आता २०२४ हे वर्ष शेवटच्या टप्प्यात आलं आहे, तर जगाला २०२५ चे वेध लागले आहेत. दरम्यान, २०२५ मध्ये घडणाऱ्या घटनांबाबत काही अशा भविष्यवाण्या समोर येत आहेत. त्यामधील काही भविष्यवाण्या ह्या लोकांची चिंता वाढवण्यासाठी पुरेशा आहेत.
जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वी २०२५ बाबत मोठी भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीनुसार २०२५ मध्ये जगाच्या विनाशाची सुरुवात होणार आहे. तसेच हळूहळू मानवजातीचा अंत होईल. शेवटी ५०७९ साल येईपर्यंत मानवाचा पृथ्वीवरून समूळ विनाश होईल.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार २०२५ मध्ये जगाच्या विनाशाला सुरुवात होईल. तसेच त्याची सुरुवात युरोपमधील एका संघर्षापासून होईल. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार २०२५ मध्ये अशा काही भयानक घटना घडतील, ज्या मानवतेला अंताच्या दिशेने घेऊन जातील. एवढंच नाही तर आणखी एक भविष्यवेत्ता नास्रेदेमस यानेही २०२५ मध्ये युरोपमध्ये एका भयंकर संघर्षाला सुरुवात होण्याची भविष्यवाणी करून ठेवली आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही भविष्यवेत्त्यांची भविष्यवाणी खरी ठरली तर जग विनाशाच्या दिशेने जाण्याची शक्यता अधिक आहे.
दरम्यान, बाबा वेंगा यांच्या आणखी काही भविष्यवाण्यांनुसार वातावरणातील बदल, भूराजकीय परिस्थितीतील बदल इत्यादींमुळे पृथ्वीवर राहणं अशक्य होऊन जाईल. त्यामुळे सन २१३०मध्ये काही वेगळ्या प्राण्यांचा मानवांशी संपर्क येईल. त्यानंतर मानव आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी पृथ्वीबाहेर अन्यत्र आश्रयाला जाईल. अखेरीस ५०७९ मध्ये पृथ्वीवरून सारं काही संपुष्टात येईल.