भारताप्रमाणे थायलंडमध्येही आहे एक ‘अयोध्या’, भगवान श्रीरामाशी काय संबंध? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:04 PM2023-12-19T22:04:21+5:302023-12-19T22:05:46+5:30

थायलंडमध्येही प्रभू रामाबद्दल तितकीच श्रद्धा आहे, जितकी भारतीय लोकांमध्ये आहे.

Ayodhya In Thailand :Like India, Thailand also has an 'Ayodhya', what is the relationship with Sri Rama? Find out.. | भारताप्रमाणे थायलंडमध्येही आहे एक ‘अयोध्या’, भगवान श्रीरामाशी काय संबंध? जाणून घ्या..

भारताप्रमाणे थायलंडमध्येही आहे एक ‘अयोध्या’, भगवान श्रीरामाशी काय संबंध? जाणून घ्या..


Ayodhya In Thailand : येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्येत राम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू झाली आहे. भारतात असा कोणी नाही, ज्याला श्रीराम आणि अयोध्या शहराचे महत्व माहित नाही. अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला आणि याच ठिकाणी त्यांनी रामराज्य चालवले. पण, तुम्हाला माहिती आहे का की, भारतातील अयोध्येप्रमाणेच थायलंडमध्येही एक अयोध्या आहे, जी अयुथया नावाने ओळखली जाते.

थायलंडमध्येही प्रभू रामाबद्दल तितकीच श्रद्धा आहे, जितकी भारतीय लोकांमध्ये आहे. थायलंडमधील या शहराचे नाव अयोध्येच्या नावावरून अयुथ्या ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, थायलंडच्या राजांच्या नावांसोबत रामाचे नाव जोडले जाते. ही तेथील प्राचीन परंपरा आहे. तेथील राजवंशातील प्रत्येक राजा हा श्रीरामाचा अवतार मानला जातो. अयोध्या आणि भगवान रामाचाचा थायलंडच्या अयुथ्याशी काय संबंध आहे? जाणून घ्या...

अयुथ्याचा इतिहास काय आहे?
असे म्हटले जाते की अयुथ्या ही प्राचीन थाई राज्य "आयुथयाना" ची राजधानी होती. युत्यायन वंशातील राजे हे रामाचे अवतार मानले जात होते आणि त्यांच्या नावाला रामाचे नाव जोडले जायचे. 1350 ते 1767 पर्यंत या साम्राज्यावर राज्य करणाऱ्या राजांना रामतीबोधी ही पदवी देण्यात आली होती.

हीच त्यांची प्रभू रामावरची नितांत भक्ती होती. रामायणाचे भारतात जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व इथे आहे. या ठिकाणी आजही अनेक हिंदू मंदिरांचे अवशेष आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांना समर्पित पूजास्थळे थायलंडची राजधानी बँकॉकपासून फक्त 50 किलोमीटर दूर आहेत. आयुथयाने आजही आपला गौरवशाली इतिहास जपला आहे. 

Web Title: Ayodhya In Thailand :Like India, Thailand also has an 'Ayodhya', what is the relationship with Sri Rama? Find out..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.