शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:56 IST

Axiom Mission-४: राकेश शर्मा यांच्यानंतर सुमारे ४१ वर्षांनी एक भारतीय व्यक्ती अंतराळ यात्रेवर जाणार आहे.

Axiom Mission-४:भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे 'अ‍ॅक्सिओम-४' मिशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. 'स्टॅटिक फायर' चाचणीनंतर बूस्टरच्या तपासणीदरम्यान यानात लिक्वीड ऑक्सिजन (LOx) गळती आढळून आल्यानंतर मोहिमेवर ब्रेक लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेअंतर्गत, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर आयएसएसमध्ये जाणार आहेत.

ऑक्सिजन गळतीमुळे स्पेसएक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) नियोजित अ‍ॅक्सिओम-४ मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलल्याची पुष्टी केली आहे. हे मिशन बुधवारी(९ जून) सांयकाळी ५.३० वाजता प्रक्षेपित होणार होते. दरम्यान, ऑक्सिजन गळतीची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर आणि रेंज उपलब्धतेनुसार नवीन प्रक्षेपण तारीख शेअर केली जाईल, असेही स्पेसएक्सने सांगितले.

१४ दिवसांची अंतराळ यात्राशुभांशू शुक्ला भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि नासा समर्थित अ‍ॅक्सिओम स्पेसच्या व्यावसायिक अंतराळयानाचा भाग आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, बुधवारी सांयकाळी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून यान आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे १४ दिवसांच्या प्रवासासाठी निघणार होते, मात्र आता ते पुढे ढकलण्यात आले आहे.

४१ वर्षांनंतर भारतीयाची अंतराळ मोहीमशुभांशू शुक्ला सुमारे ४१ वर्षांनी एक भारतीय म्हणून अवकाशा यात्रा करणार होते. यापूर्वी राकेश शर्मा यांनी सोव्हिएत युनियनच्या इंटरकॉसमॉस मोहिमेद्वारे ८ दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली होती.

कोण आहेत शुभांशू शुक्ला?१० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनौमध्ये जन्मलेले शुभांशू शुक्ला राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) चे विद्यार्थी आहेत. २००६ मध्ये त्यांना भारतीय हवाई दलात नियुक्त करण्यात आले होते. त्यांना सुखोई-३० एमकेआय, मिग-२९, जग्वार आणि डोर्नियर-२२८ यासह विविध प्रकारच्या विमानांवर २ हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IIS), बंगळुरू येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमटेक पदवी देखील मिळवली आहे.

शुभांशू गगनयान मोहिमेचा भागभारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची २०१९ मध्ये गगनयान मोहिमेसाठी भारताच्या अंतराळवीर संघात निवड झाली आहे. हे गगनयान २०२७ मध्ये प्रक्षेपित होण्याची शक्यता आहे. शुभांशू शुक्ला यांचा हा अंतराळ प्रवास भारताच्या मानवी अंतराळ उड्डाणाच्या दिशेने मैलाचा दगड ठरेल. 

 

टॅग्स :isroइस्रोNASAनासाAmericaअमेरिकाIndiaभारतindian air forceभारतीय हवाई दल