ऑटिझम फक्त मुलांमध्येच नाही, मुलींमध्येही तितकाच! मुलींमध्ये लक्षणे ओळखण्यास उशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 07:28 IST2026-02-15T07:27:28+5:302026-02-15T07:28:16+5:30

नवीन अभ्यासाने हे प्रमाण १:१ च्या जवळ असल्याचे दर्शवले आहे. लहानपणी मुलींमधील ऑटिझमची लक्षणे ओळखणे कठीण जाते.  भारतात ऑटिझमग्रस्तांची संख्या १.८ कोटी असल्याचा अंदाज आहे.

Autism is not just in boys, it is equally prevalent in girls! Delay in recognizing symptoms in girls | ऑटिझम फक्त मुलांमध्येच नाही, मुलींमध्येही तितकाच! मुलींमध्ये लक्षणे ओळखण्यास उशीर

ऑटिझम फक्त मुलांमध्येच नाही, मुलींमध्येही तितकाच! मुलींमध्ये लक्षणे ओळखण्यास उशीर

वॉशिंग्टन : ऑटिझम हा विकार प्रामुख्याने मुलांमध्येच जास्त प्रमाणात आढळतो, हा समज चुकीचा असल्याचे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. स्वीडनमधील संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, ऑटिझमचे प्रमाण मुले व मुलींमध्ये जवळपास समान आहे. ऑटिझमचे निदान होण्याचे मुला-मुलींचे प्रमाण ४:१ (४ मुले : १ मुलगी) असे मानले जात होते. मात्र,  नवीन अभ्यासाने हे प्रमाण १:१ च्या जवळ असल्याचे दर्शवले आहे. लहानपणी मुलींमधील ऑटिझमची लक्षणे ओळखणे कठीण जाते.  भारतात ऑटिझमग्रस्तांची संख्या १.८ कोटी असल्याचा अंदाज आहे.

मुलींचे निदान उशिरा का होते?

मुलींना लहानपणापासून कसे वागावे, समाजमान्य गोष्टी कशा आत्मसात कराव्यात, हे  सांगितले जाते.

मुली अन्य लोकांच्या वर्तनाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुलींनी गोष्टी आत्मसात केल्या आहेत, असेच सर्वांना वाटत असते.

‘फिमेल कॅच-अप इफेक्ट’ काय?

अभ्यासात असे दिसून आले आहे की, मुलांमधील ऑटिझमचे निदान लहानपणीच होते. याउलट, मुलींमध्ये हा विकार किशोरावस्थेत उघड होतो.  याला संशोधकांनी ‘फिमेल कॅच-अप इफेक्ट’ म्हटले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मुलींमध्ये सामाजिक संवाद कौशल्ये मुलांपेक्षा चांगली असतात.

चुकीच्या निदानाचा मुलींना बसतोय फटका

संशोधक म्हणाले की, ‘जोपर्यंत मुलींमध्ये ऑटिझमचे योग्य निदान होत नाही, तोपर्यंत त्यांना चुकीच्या मानसोपचार निदानाचा सामना करावा लागतो. यामुळे योग्य उपचार मिळत नाहीत.

ऑटिझमची सामान्य लक्षणे

लोकांशी संवाद करण्यात अडचण

वारंवार एकसारखे वर्तन, सवयी

रात आवाज, प्रकाश

किंवा गर्दीमुळे त्रास

Web Title : ऑटिज्म सिर्फ लड़कों में नहीं; लड़कियां भी समान रूप से प्रभावित, निदान में देरी

Web Summary : एक नए अध्ययन से पता चला है कि ऑटिज्म लड़कियों और लड़कों दोनों को समान रूप से प्रभावित करता है, जो 4:1 के अनुपात के मिथक को चुनौती देता है। सामाजिक नकल और 'फीमेल कैच-अप इफेक्ट' के कारण लड़कियों का निदान अक्सर बाद में होता है, जिससे गलत निदान और उपचार में देरी होती है। सामान्य लक्षणों में संचार में कठिनाई और उत्तेजना के प्रति संवेदनशीलता शामिल है।

Web Title : Autism isn't just in boys; girls are equally affected, diagnosis delayed.

Web Summary : A new study reveals autism affects girls and boys equally, challenging the 4:1 ratio myth. Girls often get diagnosed later due to social mimicry and 'female catch-up effect,' leading to misdiagnosis and delayed treatment. Common symptoms include communication difficulties and sensitivity to stimuli.