शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Austria Shooting: बंदूक घेऊन विद्यार्थी थेट शाळेत घुसला, केला अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा मृत्यू, स्वतःलाही संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:21 IST

Austria School Shooting: शाळेतील एक विद्यार्थी बंदूक घेऊन थेट शाळेत पोहोचला होता आणि त्याने अंदाधुंद गोळीबार केला.

Austria School Firing: ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर असलेल्या ग्राझमधील एका शाळेत गोळीबाराची भयंकर घटना उघडकीस आली आहे. ऑस्ट्रिया प्रेस एजन्सी एपीएच्या वृत्तानुसार, ग्राझ शहराच्या महापौरांनी या गोळीबारात ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

शाळेतील एक विद्यार्थी बंदूक घेऊन थेट शाळेत पोहोचला होता आणि त्याने अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर विद्यार्थ्याने वॉशरूममध्ये जाऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना सकाळी १० वाजता माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांनी लोकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचा आणि अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.  

पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून माहिती दिली की, शाळा रिकामी करण्यात आली आहे आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आता कोणताही धोका नाही. ऑस्ट्रियाचे ग्राझ शहर देशाच्या आग्नेय भागात आहे आणि त्याची लोकसंख्या सुमारे ३,००,००० आहे.  गोळीबारात काही लोक जखमी देखील झाले आहेत, ज्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ग्राझ शहराचे महापौर एल्के काहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये ७ विद्यार्थी आणि शाळेचे कर्मचारी आहेत. शाळेतील गोळीबाराची चौकशी करण्याची जबाबदारी स्पेशल टास्क फोर्सकडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रियाचे गृहमंत्री देखील ग्राझ शहराकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आणि अफवा पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.  

टॅग्स :FiringगोळीबारSchoolशाळाStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू