'चीनने आमच्यावरही 'या' पद्धतीने हल्ला करण्याचा केला प्रयत्न'; भारताच्या मित्रानं केलं सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 02:24 PM2020-06-20T14:24:57+5:302020-06-20T14:41:25+5:30

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील आता चीनवर अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे.

Australia’s Prime Minister Morrison says that Australia is under massive and sustained cyberattack | 'चीनने आमच्यावरही 'या' पद्धतीने हल्ला करण्याचा केला प्रयत्न'; भारताच्या मित्रानं केलं सावध

'चीनने आमच्यावरही 'या' पद्धतीने हल्ला करण्याचा केला प्रयत्न'; भारताच्या मित्रानं केलं सावध

Next

लडाखमध्ये LACवर भारत-चीनमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. दोन्ही देशांमधल्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं आहे. तर चीनच्या ४३ सैनिकांना ठार करण्यात आलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सक्षम असल्याचं सांगितलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही सावध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

कौतुकास्पद! वडिलांच्या कष्टाचं चीज; गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील आता चीनवर अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियाचे सरकार आणि देशातील काही खाजगी संस्था एका प्रभावी देशाच्या सायबर अटॅकच्या रडारवर होता, असं स्कॉट मॉरिसन यांनी सांगतिले आहे. ऑस्ट्रेलियन सायबर तज्ञांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर चीनच्या या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ला देखील स्कॉट मॉरिसन यांनी दिला आहे. याआधी देखील सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढत असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांनीही दिली होती.

भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर अमेरिकेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी ट्वीट करून, भारताप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. माइक पोम्पिओ म्हणाले की, चीनसोबत झालेल्या संघर्षात भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला. भारतीयांप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करत आहोत. या सैनिकांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि त्यांच्या समाज यांची या दु:खद प्रसंगी आम्हाला आठवण येईल, असं माइक पोम्पिओ यांनी सांगितले. तर चीनबरोबरची समस्या सोडवण्यासाठी रशियानं भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे.

CoronaVirus News: मुंबईतील 'हा' परिसर ठरतोय नवा हॉटस्पॉट; अत्यावश्यक सेवा वगळता शिथीलता रद्द करण्याचे आदेश

सीमेवरुन चीनच्या कुरापतींचा सामना करणारा भारत हा एकमेव देश नाही. चीनच्या कुरापतींमुळे जगभरातील २३ देश हैरान झाले आहेत. चीन जगभरात सर्वात जास्त लोकसंख्या असणारा आणि क्षेत्रफळात जगातील तीसरा क्रमांकावर असणारा देश आहे. चीनची सीमा १४ देशांसोबत आहे, पण एकूण २३ देशांच्या विविध भागावर चीनकडून दावा करण्यात येत आहे.

Web Title: Australia’s Prime Minister Morrison says that Australia is under massive and sustained cyberattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.